मुंबई : दरवर्षी लाखो उमेदवार देशाच्या प्रशासकीय सेवेत रुजू होण्यासाठी अर्ज करतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ( UPSC) ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. परंतु, तरीही अनेक इच्छुक त्यांच्या मेहनतीने आणि समर्पणाने ध्येय साध्य करतात. आयएएस, पीसीएस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम करतात.
तासनतास अभ्यास करतात. असे अनेक आयएएस बनले आहेत जे आधीपासून सन्माननीय नोकरीत होते. आपले उच्च पद, लाखोंचा पगार सोडून त्यांनी आयएएस होण्याची तयारी सुरू केली आणि यशही मिळाले. या यादीत आणखी एका नावाचा समावेश आहे, ते म्हणजे IAS ऐश्वर्या शेओरानचे. तिची कामगिरी देखील विशेष आहे कारण ती फेमिना मिस इंडियाची अंतिम फेरीत राहिली आहे. मॉडेलिंग आणि सौंदर्य स्पर्धेशी निगडीत असलेल्या एका मुलीने पहिल्याच प्रयत्नात आयएएस होऊन मोठे यश संपादन केले. चला जाणून घेऊया ऐश्वर्या शेओरानबद्दल.
ऐश्वर्या शेओरान ही मूळची राजस्थानची आहे. त्यांचे कुटुंब सुरुवातीपासूनच दिल्लीत राहत होते. दिल्लीतील चाणक्यपुरी येथील संस्कृती स्कूलमधून त्यांचे शिक्षण झाले. ऐश्वर्या पहिल्यापासून अभ्यासात हुशार होती. बारावीच्या परीक्षेत ९७.५ टक्के गुण मिळवून अव्वल आली होती.
नंतर ऐश्वर्याने दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून ग्रॅज्युएशन केले. ऐश्वर्याच्या वडिलांचे नाव अजय शेओरान आहे. ते भारतीय सैन्यात कर्नल आहेत आणि करीमनगर, तेलंगणा येथे तैनात आहेत. त्याच्या आईचे नाव सुमन असून त्या गृहिणी आहेत. सध्या त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत राहते.
ऐश्वर्या सुरुवातीपासून अभ्यासात चांगली होती आणि नेहमीच प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे ध्येय ठेवत असे पण तिच्या आईची इच्छा होती की ऐश्वर्याने मिस इंडिया व्हावे. त्यामुळेच तिला ऐश्वर्या रायचे नावही देण्यात आले. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐश्वर्यानेही मॉडेलिंगकडे पाऊल टाकले. 2014 मध्ये ऐश्वर्या दिल्लीची स्वच्छ आणि स्पष्ट चेहरा बनली आणि 2015 मध्ये मिस दिल्लीचा खिताब जिंकला.
नंतर ऐश्वर्याने २०१६ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला. यादरम्यान ऐश्वर्या फेमिना मिस इंडिया २०१६ मध्ये २१ वी फायनलिस्ट देखील होती. आईसाठी ती इथपर्यंत पोहोचली. पण आता तिला तिचे स्वप्न पूर्ण करायचे होते. 2018 मध्ये ऐश्वर्याने UPSC ची तयारी सुरू केली. यासाठी त्यांनी 10 महिने घरी अभ्यास केला. कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात ऐश्वर्याने अवघ्या 10 महिन्यांत यश संपादन केले. UPSC ऑल इंडियामध्ये 93 वा क्रमांक मिळवून मॉडेल असलेली ऐश्वर्या आयएएस अधिकारी बनली.