Take a fresh look at your lifestyle.

स्वप्नीलच्या ‘अश्वत्थ’ची टीझर प्रकाशित; पहा विशेष काय आहे त्यामध्ये

मुंबई : मराठीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी याने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. त्याच्या नवीन ‘अश्वत्थ’ या चित्रपटाची घोषणा त्याने केली आहे. लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अश्वत्थ’ हा सिनेमा २०२२ च्या हिवाळ्यात प्रदर्शित होणार आहे. स्वप्नील जोशीने या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर ट्विटरवर प्रकाशित केले आहे. ‘अश्वत्थ’चा टीझर भगवत गीतेतील एका लोकप्रिय अशा श्लोकाच्या पार्श्वभूमीवर बनवलेला आहे. संकृतमधील या श्लोकाचा ढोबळ अर्थ आहे की, जेव्हा मनुष्य योगारूढ होतो तेव्हा तो आपला उद्धार स्वतःच करतो आणि स्वतःच आत्मबलाच्या सामर्थ्यावर ऊंची गाठतो. त्याने आपल्या आत्म्याचे अधःपतन होवू देता कामा नये. मनुष्य स्वतःच स्वतःचा बंधू असतो आणि स्वतःच स्वतःचा शत्रू असतो…

Advertisement

“मन, बुद्धी, चित्त आणि अहंकारावर मात करून स्वाभिमानाने जगतो तो अश्वत्थ..” अशी या टीझरच्या माध्यमातून मांडणी केली आहे. या टीझरचा व्हीडीओ प्रसारित करून स्वप्नील जोशीने आपल्या चाहत्यांना म्हटले आहे की, “नवीन वर्ष, नवीन संकल्प! नांदी…नव्या वर्षाची, नव्या संकल्पाची! नांदी…अश्वत्थची !!!” या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक लोकेश गुप्ते याने केले आहे. एबी आणि सीडी, एक सांगायचंय,ऋुणानुबंध, डेटभेट आणि मुंगळा हे सिनेमे यापूर्वी गुप्ते यांनी बनवले आहेत. टीझरला आवाज मकरंद देशपांडे यांचा आहे. इतर कलाकार आणि तंत्रज्ञ याबद्दलची माहिती अजून गुलदस्त्यात असली तरी स्वप्नील जोशी आणि लोकेश गुप्ते हे नवं समीकरण, नव्या वर्षात, ‘अश्वत्थ’च्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर काहीतरी नवं आणणार, याबद्दल सर्वांनाच खात्री असल्याचे काहींना वाटते.

Advertisement

विविध प्रयोग करत स्वतःच्या सशक्त अभिनयाने चित्रपट, मालिका, वेबसिरीज यांच्या माध्यमातून आज स्वप्नील जोशी घराघरात पोहोचला आहे. रामायण, कृष्ण, हद कर दि, दिल विल प्यार, तू तू मैं मैं या गाजलेल्या मालिकांपासून दुनियादारी, मोगरा फुलला, मुंबई-पुणे-मुंबई यांसारखे अगणित गाजलेले चित्रपट स्वप्नीलच्या नावावर आहेत. अलीकडेच आलेल्या ‘समांतर’ या वेबसिरीजमध्ये स्वप्नीलची प्रमुख भूमिका होती आणि तिचे दोन्ही सिझन गाजले होते. या पार्श्वभूमीवर स्वप्नीलच्या या नवीन चित्रपटाबद्दल रसिकांच्या मनात उत्सुकता लागून राहिली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply