नागपूर : मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाचे शिर्डीपर्यंतचे काम येत्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या टप्प्यातील केवळ 45 किलोमीटरचे काम बाकी आहे. हा सुमारे 530 किलोमीटरचा टप्पा असून, पैकी 485 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. खरंतर या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी मे-2021 पर्यंतची डेटलाईन होती, परंतु मधल्या काळात कोरोना संकट आल्याने काही दिवस हे काम बंद राहिल्याने ही डेटलाइन पाळता आली नाही. आता संपूर्ण महामार्गाचे काम डिसेंबर-2022 पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे..
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड
यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यांत काही मोठ्या पुलांचे काम फेब्रुवारी-2022 पर्यंत पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे वाहनचालकांना अशा ठिकाणी वळण घेऊन पुढे जावे लागेल. पुलांचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी चार-पाच महिने लागणार आहेत. या टप्प्यामध्ये असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव टनेलचे काम पूर्ण झालेय.
समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये
– सुमारे 55 हजार 322 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प.
– आठ पदरी महामार्गाची रुंदी 22.5 मीटर, तर उंची 4 ते 12 मीटरपर्यंत.
– महामार्गाला संरक्षक भिंत बांधली जाईल. त्यामुळे जनावरे व पादचाऱ्यांना रोडवर येता येणार नाही.
– महामार्गावर कमाल 150 किलोमीटर प्रती तास वेगाने वाहन चालवता येईल. त्यामुळे नागपूर- मुंबई हे 701 किलोमीटरचे अंतर केवळ 8 तासांत, तर नागपूर- औरंगाबाद अंतर 4 तासांत पूर्ण करता येईल.
– हा महामार्ग दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर, दी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, वर्धा व जालना येथील ड्राय पोर्टस् आणि मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या औद्योगिक क्षेत्रांना एकमेकांशी जोडणार आहे.
– महामार्गावर 17 गृहप्रकल्पही उभारले जाणार. पैकी 9 प्रकल्प विदर्भात आहेत. एक नागपूरजवळ आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड राहील. ते अंडरपासेसने जुळलेले राहतील.
– सीसीटीव्ही कॅमेरे व प्रत्येकी 5 किलोमीटरवर मोफत टेलिफोन बूथ राहतील. ऑप्टिक फायबर केबल, गॅस पाइपलाइन, वीज लाइनसाठी विशेष जागा सोडली जाईल. महामार्गावर येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी २५ मार्ग राहतील.
बाब्बो.. आता चीन-पाकिस्तानचा प्रकल्पही सापडलाय धोक्यात; ‘त्यांच्या’ मुळे चीनचे होणार कोट्यावधींचा फटका
भारताविरुद्धच्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या स्टार बॅटसमॅनची तडकाफडकी निवृत्ती, क्रिकेट विश्वात खळबळ…!