Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या स्टार बॅटसमॅनची तडकाफडकी निवृत्ती, क्रिकेट विश्वात खळबळ…!

मुंबई : टीम इंडियाविरुद्ध पहिल्या कसोटीत झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे आधीच नैराश्यात गेलेल्या दक्षिण आफ्रिकेसाठी आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या दिग्गज बॅटसमॅनने या पराभवानंतर अचानक तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.. या फलंदाजाचे नाव आहे, दक्षिण आफ्रिकेचा विकेट किपर-बॅटर क्विंटन डी कॉक.. (Quinton de Kock)

Advertisement

क्विंटन डी कॉक याने एकदम अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. क्रिकेट विश्वातील ख्यातनाम असा हा खेळाडू ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. यष्टीरक्षणाबरोबरच धडाकेबाज फलंदाजीसाठी तो प्रसिद्ध आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसह भारत नि जगभरात त्याचे चाहते आहेत. क्विंटनने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा केल्याने त्याच्या या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे..

Advertisement

‘क्रिकेट दक्षिण आफ्रीके’ने याबाबट ट्विट करुन माहिती दिली. कुटुंबाला वेळ देण्यासाठी आपण टेस्टमधून निवृत्ती घेत असल्याचे क्विंटन डी कॉक याने म्हटलं आहे. डी कॉकची पत्नी साशा हार्ली सध्या गर्भवती आहे असून, त्यांना जानेवारी महिन्यात बाळ होणार आहे. या बाळाच्या स्वागतासाठी आपल्याला कुटुंबाला वेळ द्यायचा आहे. कारण कुटुंबच आपलं सर्वस्व आहे. त्यामुळे आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करीत असल्याचं क्विंटनने म्हटलं आहे.

Advertisement

क्विंटनने काय म्हटलंय..?
“मी हा निर्णय सहज घेतलेला नाही. हा निर्णय घेण्याआधी मी भविष्याचा भरपूर विचार केला, पण माझी पत्नी साशा आणि मी आमच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहोत. त्यामुळे आयुष्यात नेमकं कशाला प्राधान्य द्यावं, याबाबत विचार केला. माझं कुटुंब माझ्यासाठी सर्व काही आहे. आमच्या आयुष्यातील या नव्या आणि रोमांचक अध्यायात कुटुंबासोबत सहभागी होण्यासाठी मला वेळ हवा होता..!”

Loading...
Advertisement

क्विंटन म्हणतो, की “माझे कसोटी क्रिकेटवर प्रेम आहे. मला मैदानात देशाचे प्रतिनिधित्व करायला खूप आवडतं. मी आतापर्यंत क्रिकेटमध्ये बरेच चढ-उतार पाहिले आहेत. विजयानंतर सेलिब्रेशन केलं, तसेच कठीण परिस्थितीचाही सामना केला. मला क्रिकेट खूप आवडतंच, पण त्या पलिकडे जाऊन खूप प्रेमळ असं काहीतरी मला गवसलंय. आयुष्यात आपण वेळ सोडून सारं काही विकत घेऊ शकतो. आता माझ्यासासाठी सर्वात महत्त्वाच्या माणसांसाठी योग्य ते करण्याची वेळ आलेली आहे..!”

Advertisement

“मी कसोटी क्रिकेट प्रवासाच्या सुरुवातीपासून भाग असलेल्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो. माझे प्रशिक्षक, संघातील सहकारी, विविध व्यवस्थापन संघ आणि माझे कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींना धन्यवाद..! तुमच्या पाठिंब्याशिवाय मी कर्तबगारी दाखवू शकलो नसतो. माझ्या कारकिर्दीचा हा निश्चितच शेवट नाही. मी पांढर्‍या चेंडूच्या क्रिकेटसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. मी भविष्यात माझ्या क्षमतेनुसार माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करेन. भारताविरुद्धच्या या उर्वरित कसोटी मालिकेसाठी माझ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा..!”

Advertisement

लूट लो..! केवळ 10 रुपयांत 12 वॅटचा एलईडी बल्ब मिळणार.. मोदी सरकारची खास योजना..
भारताचा मास्टरस्ट्रोक..! ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानने घेतलीय माघार; अफगाण लोकांना मिळणार दिलासा

Advertisement
Advertisement

Leave a Reply