Take a fresh look at your lifestyle.

लूट लो..! केवळ 10 रुपयांत 12 वॅटचा एलईडी बल्ब मिळणार.. मोदी सरकारची खास योजना..

नवी दिल्ली : सध्याच्या काळात राेज नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी 100 ते 200 वॅटचे टंगस्टन तारेचे पिवळे बल्ब मोठ्या प्रमाणात दिसत असत. मात्र, आता त्याचा वापर बराचसा कमी झाला असून, त्याची जागा एलईडी बल्बने घेतली आहे. मात्र, पिवळ्या बल्बच्या तुलनेत एलईडीचे बल्ब महाग असतात. मात्र, 100 वॅटच्या बल्बइतकाच किंबहूना त्यापेक्षा अधिक प्रकाश 10 वॅटच्या एलईडी बल्बमधून मिळतो.. शिवाय वीजबचत तर होतेच, शिवाय ग्राहकांना येणारे लाईट बिलही कमी होते..

Advertisement

मात्र, तरीही ग्रामीण भागात अजूनही एलईडी बल्ब वापराचे प्रमाण कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन मोदी सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांना परवडतील, या दरात एलईडी उपलब्ध करुन देण्यासाठी ग्राम उजाला योजना आणली आहे. या योजनेत अवघ्या 10 रुपयांत 12 वॅटचा एलईडी बल्ब खरेदी करता येणार आहे. शिवाय त्याला 3 वर्षांची गॅरंटीही मिळेल.

Advertisement

एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लि. (ईईएसएल) ची सहायक कंपनी असलेली ‘सीईएसएल’ अर्थात ‘कन्व्हर्जेन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड’ या सरकारी कंपनीमार्फत ग्राम उजाला कार्यक्रमात अवघ्या 10 रुपयांत एका कुटुंबासाठी 7 ते 12 वॅटचे 5 बल्ब दिले जात आहेत. सध्या ही योजना बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सुरू करण्यात आली आहे. येथील ग्रामीण भागातील कुटुंबे हे बल्ब विकत घेऊ शकतात. या योजनेसाठी 31 मार्च 2022 पर्यंत मुदत आहे..

Advertisement

विशेष म्हणजे, या राज्यांमध्ये ठिकठिकाणी अगदी कॅम्प लावून ‘सीईएसएल’मार्फत बल्ब वितरणाचे काम सुरु आहे. केवळ 10 रुपयांत हे बल्ब मिळणार आहेत. ‘सीईएसएल’ने आतापर्यंत या योजनेत 50 लाख एलईडी बल्बचे वाटप केल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

बाब्बो.. आता चीन-पाकिस्तानचा प्रकल्पही सापडलाय धोक्यात; ‘त्यांच्या’ मुळे चीनचे होणार कोट्यावधींचा फटका
पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदाच करा गुंतवणूक; दर महिन्यास मिळेल उत्पन्नाची हमी; जाणून घ्या डिटेल..

Advertisement
Advertisement

Leave a Reply