अहमदनगर : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा अहमदनगर च्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करून प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब यांचे मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाकडून जुन्या पेंशनसाठी राष्ट्रीय पातळीवरील लढा सुरू आहे. या लढ्यातील पहिल्या टप्प्यात देशातील सर्व राज्यात जिल्हाधिकारी यांचे मार्फत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात जुनी पेन्शन लागू करावी,शिक्षण सेवक पद बंद करून नियमित शिक्षकांची नेमणूक करावी तसेच कार्यरत शिक्षण सेवकांचे मानधन वाढवावे,नव्या शैक्षणिक धोरणातील शिक्षण व शिक्षकविरोधी तरतूदी वगळण्यात याव्यात,सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात,पेंशन मार्च मधील सहभागी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे,बदली प्रक्रिया तात्काळ सुरु करावी या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्याचा समावेश आहे. या एक दिवसीय आंदोलन प्रसंगी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य उपाध्यक्ष सुनिल जाधव, राज्यसंघटक राजेंद्र निमसे,संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड , संघाचे जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे,ऐक्य मंडळाचे जिल्हासरचिटणीस सुरेश नवले, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव कराड ,महेश लोखंडे , मधुकर डहाळे, रज्जाक सय्यद , संदीप शेळके, संदीप भालेराव,प्रदीप चक्रनारायण ,अशोक बडे, बथुवेल हिवाळे ,संतोष ठाणगे विनायक गोरे , आदिनाथ पोटे, लहू फलके ,राहुल व्यवहारे, अशोक दहिफळे , भाऊसाहेब लाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.तसेच महसूल कर्मचारी संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे यांनी या आंदोलनात सक्रिय पाठिंबा दर्शविला