मुंबई : मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा, परंतु राज्य सरकारने दारूवरील कर कमी न केल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती..
त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. विधीमंडळात बोलताना ते म्हणाले, की पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केल्यास, राज्याचा २५० कोटी रुपयांचा महसूल कमी होईल. त्याचा सरकारी तिजोरीवर परिणाम होईल.. भाजप शासीत राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे. पश्चिम बंगाल व तमिळनाडू यांनी कर कमी केलेला नाही. त्यामुळे राज्यातही पेट्रोल डिझेलचे दर कमी करता येणार नसल्याचे ते म्हणाले.
दारुवरील कर कपात का..?
ठाकरे सरकारने नुकतेच विदेशी दारूवरील कर ३०० टक्क्यांवरुन १५० टक्क्यांवर आणले होते. त्यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की पूर्वी दिल्लीत ७५० मिली लिटर दारूची बॉटल 3000 रुपयांना मिळायची, तिच बॉटल महाराष्ट्रात 5000 रुपयांना मिळायची. त्यामुळे महाराष्ट्राचा महसूल बुडायचा.. आता आयात केलेल्या दारूवरील कर कमी केल्याने, असा प्रकार होणार नाही. दारूची तस्करी होणार नाही, तसेच बनावट दारूही विकली जाणार नाही. पूर्वी राज्याला दारू विक्रीतून 100 कोटी रुपयांचा महसूल मिळायचा. आता वर्षाला 200 कोटी रुपयांचा महसूल मिळेल, असे पवार म्हणाले.
आम्हीही हेच म्हणालो असतो..
राज्यात दारूचे दर कमी केले, पण पेट्रोल-डिझेलचे कमी केले नसल्याची टीका विरोधी पक्षातील नेते सुधीर मुनंगटीवार यांनी केली होती. त्यावर पवार म्हणाले, की “विरोधी पक्षाने अशी टीका करणे साहजिक आहे.. मुनंगटीवार सत्ताधारी पक्षात नि आम्ही विरोधी पक्षात असतो, तर आम्हीही अशीच टीका केली असती..”
वाव.. टेलिकॉम कंपन्यांचे ‘आम आदमी’ साठी ‘हे’ आहेत प्रीपेड प्लान; जाणून घ्या, कोणता प्लान ठरेल बेस्ट ?
नव्या वर्षात चीनसमोर आलेय ‘ते’ ही संकट; ‘त्यासाठी’ पाकिस्तान ठरतोय कारणीभूत; पहा, नेमके काय घडलेय ?