Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मोठी घोषणा..

मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापना होताच महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली होती. त्याअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय झाला, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.. मात्र, नंतर राज्यावर कोरोनाचे संकट कोसळले नि राज्याची आर्थिक घडी विस्कटली..

Advertisement

दरम्यान,  राज्य सरकारने थकबाकीदारांना कर्जमाफीचा लाभ दिला, मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.. त्याची भरपाई करण्यासाठी आता ठाकरे सरकारने या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज दराने कर्ज देणार असल्याचे जाहीर केले आहे..

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात याबाबत घोषणा केली. मात्र, या घोषणेनंतरही सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार की नाही, हा सवाल कायम आहे. कारण, प्रोत्साहनपर अनुदानाबाबत सरकारने कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे..

Advertisement

प्रोत्साहनपर रकमेचे काय..?
कर्जमाफी योजनेत 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले. मात्र, नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजार रुपये हे प्रोत्साहनपर देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. कोरोनामुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला. आता सर्व काही सुरळीत झाले असले, तरी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत मिळणार का, हा प्रश्न तसाच आहे.

Advertisement

अजित पवार काय म्हणाले…?
“नियमित व्याज आणि कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही. मात्र, याबाबत राज्य सरकार सजग आहे. अशा शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. शिवाय या नियमित असलेल्या शेतकऱ्यांचीही कर्जमाफी करायची आहे. मात्र, त्याआधी राज्य सरकारची आर्थिक स्थिती सुधारणे महत्वाचे आहे. आमची मदतीची इच्छा आहे, पण राज्याची तशी आर्थिक स्थिती नाही,” असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

Advertisement

वाव.. नव्या वर्षातही पडणार IPO चा पाऊस..! तब्बल ‘इतक्या’ कंपन्यांचे आयपीओ येणार; जाणून घ्या माहिती
कोरोनाबाबत केंद्र सरकारने दिलीय महत्वाची माहिती; देशात ओमिक्रॉन बरोबरच ‘या’ व्हेरिएंटचाही प्रभाव

Advertisement
Advertisement

Leave a Reply