Take a fresh look at your lifestyle.

एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाचा दणका..! आंदोलकांवर कारवाईची टांगती तलवार..!

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. एसटी महामंडळाने अनेक वेळा आवाहन करुनही एसटी कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत.. त्यामुळे एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कामगारांना महामंडळाने बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

Advertisement

काही कर्मचाऱ्यांना या कारवाई विरोधात स्थानिक कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली.. त्यावर लातूर व यवतमाळ येथील कामगारांना दणका देताना, न्यायालयाने एसटी महामंडळाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिलाय. न्यायालयाच्या या निकालानंतर महामंडळाने लगेच संबंधित 9 कामगारांना सेवेतून बडतर्फ केले आहे.

Advertisement

लातुर आणि यवतमाळ विभागातील कर्मचाऱ्यांविरोधात नियोजित कामगिरीवर गैरहजर, एसटी वाहतूकीस अडथळा निर्माण करणे, इतर कर्मचाऱ्यांना संपासाठी प्रवृत्त करणे, एसटीची वाहतूक बंद करणे, आर्थिक नुकसान करणे आदी कारणांसाठी दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. त्यावर समक्ष सुनावणी घेऊन राज्य परिवहन सेवेतून बडतर्फ का करु नये, अशी नोटीस बजावली होती.

Advertisement

मंडळाच्या नोटीसीविरोधात संबंधित कर्मचाऱ्यांनी  कामगार न्यायालय, लातूर व यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यावर कामगार न्यायालयाने ही तक्रार अवैध ठरविताना एसटीने केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला.

Advertisement

एसटी संपात सहभागी असणाऱ्या 9 कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने लगेच बडतर्फ केले आहे. पहिल्या टप्प्यात 9 जणांना बडतर्फ करण्याच्या नोटिसा एसटी महामंडळाने पाठविल्या होत्या. त्याविरोधात 9 कर्मचाऱ्यांनी  लातूरच्या कामगार न्यायालयामध्ये स्थगिती मिळविण्यासाठी अपील दाखल केले. मात्र, कामगार न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळताना महामंडळाच्या कारवाईच्या निर्णयाचे समर्थन केलंय.

Advertisement

लातूर जिल्ह्यातील 287 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं. पैकी 12 कर्मचारी कामावर हजर झाले असून, 267 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. 23 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कामावर रुजू होण्याची मुदत एसटीच्या लातूर विभागाने दिली होती. पैकी फक्त 19 कर्मचारीच कामावर रुजू झालेत. त्यामुळे एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे..

Advertisement

बाब्बो.. फक्त पैशांसाठीच पाकिस्तानने केला होता ‘तो’ प्लान; अमेरिकेकडून अब्जावधी उकळले; पहा, कुणी केलाय ‘हा’ खुलासा
महत्वाची बातमी : जानेवारी महिन्यात ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या कामाचे नियोजन करताना लक्षात ठेवा

Advertisement
Advertisement

Leave a Reply