पुणे : सध्या शेतीत मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा, औषधांचा वापर केला जातो. त्यामुळे शेतीच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली असली, या हायब्रिड धान्यामुळे, भाज्यांमुळे मानवी आरोग्याचा प्रश्न वाढले आहेत. त्यामुळे रासायनिक औषधांचा वापर कमी करुन सेंद्रिय पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीचे महत्व वाढले आहे.. मोदी सरकारही आता नैसर्गिक शेती वाढविण्यावर भर देत आहे..
मोदी सरकारनंतर आता ठाकरे सरकारनेही सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने नुकताच महत्वाचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार, सेंद्रिय शेतीचे निष्कर्ष, त्याबाबतच्या सुचना देण्याचे महत्वाचे काम आता राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना करावे लागणार आहे. याबाबत योग्य सुचना नि निष्कर्ष अहवाल सादर करण्याच्या सुचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी विद्यापीठांना केल्या आहेत.
सध्याच्या रासायनिक शेती पध्दतीत बदल करुन पुन्हा सेंद्रिय शेतीचे (organic farming) क्षेत्र वाढविण्यासाठी सरकारी पातळीवर मोठे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, हे करताना त्यातील बारकावे लक्षात यावेत, तसेच कृषी विद्यापीठाकडील यंत्रणा, तेथील अनुभवी कृषितज्ज्ञांचा फायदा व्हावा, यासाठी हे काम विद्यापीठांना देण्यात आले आहे.. त्याच अनुशंगाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना अहवाल सादर करावे लागणार आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नियोजनात तत्परता येणार आहे. थेट शेतकऱ्यांमध्ये जाऊन काम करण्याची संधी कृषितज्ज्ञांना मिळणार आहे. सध्या केवळ सेंद्रिय शेतीसाठी कोणत्या गोष्टी पूरक आहेत, याबाबतचा अहवाल सादर करायचा आहे.
राज्य सरकारने या कामासाठी विद्यापीठांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी दिला आहे. सेंद्रिय शेतीचा शास्त्रीय अभ्यास आणि योग्य शिफारसी विद्यापीठांना करायच्या आहेत. विद्यापीठांच्या अहवालामुळे सेंद्रिय शेतीला गती येऊ शकते. त्यामुळे राज्य सरकार आता कृषी विद्यापीठाच्या अहवालावरुन योग्य त्या सुचना करु शकणार आहे.
दरम्यान, आगामी वर्ष हे महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षात कोणकोणते उपक्रम हातळता येतील, सेंद्रिय शेतीचे क्षेत्र कसे वाढवता येईल, तसेच गावे स्वयंपूर्ण करणे आणि वृक्षशेतीद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे, या बाबी महत्वाच्या आहेत. राज्य सरकारने सेंद्रिय शेती आणि महिला शेतकरी सन्मान वर्षात कृषी विद्यापीठाचा कसा उपयोग करुन घेता येईल, यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
बाब्बो.. फक्त पैशांसाठीच पाकिस्तानने केला होता ‘तो’ प्लान; अमेरिकेकडून अब्जावधी उकळले; पहा, कुणी केलाय ‘हा’ खुलासा
वाव.. नव्या वर्षातही पडणार IPO चा पाऊस..! तब्बल ‘इतक्या’ कंपन्यांचे आयपीओ येणार; जाणून घ्या माहिती