भारताविरुद्ध डावात 10 बळी घेणाऱ्या एजाज पटेलला दाखवला बाहेरचा रस्ता.. न्युझीलंड निवड समितीचे कारण वाचून धक्का बसेल..
नवी दिल्ली : भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये मुंबई येथे झालेल्या कसोटी सामन्यात एका डावात सर्वच्या सर्व १० बळी घेऊन न्यूझीलंडच्या एजाज पटेलने दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले. मात्र, आता या एजाज पटेल यालाच न्यूझीलंडने धक्का दिला असून, त्याला थेट कसोटी संघातून बाहेरची वाट दाखवलीय.
बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी नुकतीय न्युझीलंड संघाची घोषणा करण्यात आली. त्यात एका डावात १० बळी घेऊन इतिहास रचणाऱ्या एजाज पटेलला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, एजाज पटेलला संघाबाहेर ठेवण्यासाठी न्युझीलंडच्या निवड समितीने दिलेले कारण वाचल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही.
न्यूझीलंडच्या निवड समितीच्या म्हणण्यानुसार, न्यूझीलंडमधील एकूण परिस्थितीचा विचार करता, एजाज पटेलला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसनदेखील खेळणार नाही.
केन विल्यमसन याच्या गैरहजेरीच त्यांचा सलामीवीर टॉम लॅथम न्यूझीलंडच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. भारताविरुद्ध मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यातही त्याने किवी संघाचे नेतृत्व केलं होते. न्यूझीलंडमधील वातावरण आणि तेथील खेळपट्ट्या विचारात घेऊन किवी संघाने वेगवान गोलंदाजी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संघात टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, नील वॅगनर, काइल जेमिन्सन यांच्यासोबतच मॅट हेन्रीला 13 सदस्यीस संघात समाविष्ट करण्यात आले आहे. न्युझीलंड संघात या कसोटी मालिकेसाठी डेवेन कॉन्वे या फलंदाजाचेही पुनरागमन झाले आहे.
भारताविरुद्ध झालेल्या कानपूर कसोटीत एजाज पटेल याच्याऐवजी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या रचिन रवींद्र याला फिरकीपटू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. शिवाय डेरेल मिचेल यानेही कसोटी संघातील आपले स्थान कायम राखलेय.
न्यूझीलंडचा संघ – टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवेन कॉन्वे, मॅट हेन्री, काइल जेमिन्सन, डेरेल मिचेल, हेन्री निकोल्स, रचिन रविंद्र, टीम साऊदी, रॉस टेलर, नील वॅग्नर, विल यंग
अमेरिका आणि चीनच्या वादात पाकिस्तान अडकला; ‘त्यासाठी’ करतोय अमेरिकेची मनधरणी
… म्हणून गांगुलीवर भडकलाय ‘हा’ माजी क्रिकेटपटू; ‘त्या’ वादावर दिलेय महत्वाचे स्पष्टीकरण