Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, मोदी सरकारने या दोन महत्वाच्या औषधांवर बंदी घातली…

नवी दिल्ली : मोदी सरकार आता रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीवर भर देत आहे.. त्याचाच एक भाग म्हणून मोदी सरकारने आता आरोग्यासाठी धोकादायक असणाऱ्या रासायनिक खते-औषधांवर कारवाई सुरु केली आहे.. मोदी सरकारने नुकतीच दोन कीटकनाशकांवर बंदी घातली. ‘स्ट्रेप्टोमायसिन’ आणि ‘टेरासायक्लिन’ अशी या दोन कीटकनाशकांची नावे आहेत.

Advertisement

केंद्राच्या आदेशानुसार, आता 2024 नंतर भारतीय कंपन्या या दोन कीटकनाशकांची विक्री करू शकणार नाहीत. टोमॅटो आणि सफरचंद पिकांचे रोगापासून संरक्षण करण्यासाठी या दोन्ही औषधांचा वापर केला जातो. या दोन्ही औषधांमध्ये पीक संसर्ग रोखण्याची मोठी क्षमता आहे, परंतु त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचा दावा केला जातोय.

Advertisement

मोदी सरकारने 1 फेब्रुवारी 2022 पासूनच ‘स्ट्रेप्टोमायसिन’ आणि ‘टेरासायक्लिन’ या कीटकनाशकांच्या आयातीवर, तसेच देशातील उत्पादनावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. ज्या कंपन्यांनी कच्चा माल मागवला आहे, त्यांना जुना साठा काढण्यासाठी वेळ दिला जाईल. या दोन्हींचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या ३१ जानेवारी २०२२ ते २०२४ पर्यंत यापासून तयार केलेली उत्पादने विकू शकतील. हे बुरशीनाशक आणि जीवाणूजन्य वनस्पती रोग नियंत्रक औषध असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

दरम्यान, मोदी सरकारने यापूर्वीही मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरणाऱ्या 27 कीटकनाशकांवर बंदी आणली आहे.. मात्र, ही औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांची मोठी लाॅबी असून, त्यांचा मोठा दबाव आहे. त्यामुळे या निर्णयाची आजवर अंमलबजावणी झालेली नाही. सध्या या कीटकनाशकांचे फायदे नि तोट्यांचा आढावा घेतला जात आहे. सरकारला ही औषधे मानवी आरोग्यासाठी धोकादायक वाटत असतील, तर त्यावर बंदी घातली जाऊ शकते. सध्या वरील दोन नवीन कीटकनाशकांवरील बंदीचा मुद्दा मोठ्या चर्चेत आहे..

Advertisement

वजन कमी करायचेय तर.. कमी कार्बोहायड्रेटसाठी या गोष्टींचे करा सेवन.. राहा निरोगी
आदित्य ठाकरे यांना जिवे मारण्याची धमकी, आरोपी निघाला सुशांतसिंहचा चाहता…

Advertisement
Advertisement

Leave a Reply