Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

गुंडा-पुंडाच्या राजकारणाला निवडणूक आयोगाचा दणका.. निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय..

मुंबई : राजकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला असून, त्यामुळे राजकीच पक्षांना मोठा दणका बसला आहे.. कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी देताना, राजकीय पक्षांना आता मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. निवडणुक आयोगाने नेमका असा काय निर्णय घेतला आहे, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

राजकारणातील गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास, त्यामागील कारणेही राजकीय पक्षांना द्यावी लागणार आहेत. निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी जनतेला समजली पाहिजे, अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे.

Advertisement

निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे, राजकीय पक्षांना आता त्यांच्या उमेदवाराचे ‘क्राइम रेकॉर्ड’ जनतेसमोर ठेवावे लागेल. त्यामुळे स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार न दिल्यास, राजकीय पक्षांचीही मोठी कोंडी होणार आहे. हा राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने दिलेला मोठा दणका असल्याचे मानले जात आहे..

Loading...
Advertisement

याबाबत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की एखाद्या राजकीय पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिली, तर थेट जनतेसमोर त्याचे कारण द्यावे लागेल. हाच उमेदवार का निवडला, हे जनतेला सांगावे लागेल. ज्या उमेदवाराला मतदान करायचे आहे, त्याच्याबाबत मतदारांना संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. ही जबाबदारी अर्थातच संबंधित राजकीय पक्षाची आहे.

Advertisement

चांगले उमेदवार मिळण्याची आशा
निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे निवडणुकीत स्वच्छ, चांगल्या प्रतिमेचे उमेदवार मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण, यापुढे निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या एखाद्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्यास, त्याचा तपशील वर्तमानपत्रे, टीव्ही, संकेतस्थळाच्या माध्यमातून जाहीर करावा लागणार आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

Advertisement

बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप : अंतिम फेरीत पोहोचणारा हा ठरला पहिला भारतीय पुरुष खेळाडू
बापरे.. चीनमध्ये पुन्हा कोरोना..! ‘या’ मोठ्या शहरात कडक लॉकडाऊनचा निर्णय; जाणून घ्या, काय आहे खरे कारण

Advertisement
Advertisement

Leave a Reply