Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांनो, शेतीकामासाठी ट्रॅक्टर घ्या, मोदी सरकार देणार निम्मे पैसे.. योजनेबाबत जाणून घ्या..

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारकडून विविध योजना राबविण्यात येतात.. शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी अनेक उपकरणे, मशीनची आवश्यकता भासते. त्यात शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचे उपकरण म्हणजे, ट्रॅक्टर… ! मोदी सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी 50 टक्के सबसिडी देत आहे.. विशेष म्हणजे, शेतकरी कोणत्याही कंपनीचा आपल्या आवडीचा ट्रॅक्टर विकत घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना निम्मीच रक्कम घालावी लागेल. उर्वरित अर्धी रक्कम मोदी सरकार सबसिडी म्हणून देणार आहे…

Advertisement

शेतीकाम करण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकत घेता यावा, यासाठी मोदी सरकारने पीएम किसान ट्रॅक्टर योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी कोणत्याही कंपनीचा ट्रॅक्टर अगदी निम्म्या किंमतीत विकत घेऊ शकतात. ट्रॅक्टरच्या किंमतीतील अर्धी रक्कम मोदी सरकार सबसिडी देणार आहे.. शिवाय काही राज्य सरकार आपल्या पातळीवर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर २० ते ५० टक्के सबसिडी देते. अर्थात, पहिल्यांदा ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यालाच ही सबसीडी मिळते..

Advertisement

शेतकऱ्यांना सबसिडीचा फायदा घेण्यासाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, जमिनीचे कागदपत्र, बॅंकेची माहिती, पासपोर्ट साइज फोटोची आवश्यकता लागणार आहे.

Advertisement

शेतीच्या उपकरणांसाठी सबसिडीच्या माध्यमातून मदत करण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फारच कमी किंमतीत उपकरणे खरेदी करता येतात. ही योजना छोट्या शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून आणण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी सरकार ही सुविधा देते आहे.

Advertisement

योजनेची वैशिष्ट्ये

Advertisement
  1. केंद्र सरकारद्वारे संचलित पीएम किसान ट्रॅक्टर योजनेत शेतकऱ्यांना नव्या कृषी उपकरणांच्या खरेदीवर मोदी सरकारकडून ५० टक्के सबसिडी मिळते.
  2. कमी उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक कृषी उपकरणे विकत घेता येतात.
  3. सबसिडीद्वारे ट्रॅक्टर विकत घेऊन शेतकऱ्यांना अधिक सक्षमपणे शेती करता येते.
  4. शेतकरी कोणत्याही कंपनीचा ट्रॅक्टर अर्ध्या किंमतीत विकत घेऊ शकताे. उर्वरित रक्कम मोदी सरकार देते.
  5. योजनेचा लाभ शेतकऱ्यांना त्यांच्या बॅंक खात्यात थेट दिला जातो.
  6. राज्य सरकारही शेतकऱ्यांना आपल्या पातळीवर ट्रॅक्टरसाठी २० ते ५० टक्के सबसिडी देते.
  7. योजनेचा लाभ घेण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी)च्या मदतीने अर्ज करू शकता.

आजची रेसिपी : नाश्त्यासाठी असे तयार करा टेस्टी कांदे पोहे; ही घ्या, अगदी सोपी रेसिपी
महाराष्ट्राला भरली हुडहुडी..! पुढील दोन दिवसांत कशी असेल परिस्थिती, हवामान विभाग काय म्हणतेय…?

Advertisement
Advertisement

Leave a Reply