Take a fresh look at your lifestyle.

एसटीचा संप संघटनेकडून मागे, कर्मचारी मात्र आंदोलनावर ठाम, सरकार काय निर्णय घेणार..?

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमधील विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्याने, तसेच कर्मचाऱ्यांच्या अन्य आर्थिक मुद्यांवर एसटी महामंडळाशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी सोमवारी (ता. 20) रात्री संप मागे घेत असल्याची घोषणा केली.

Advertisement

गुजर यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांना 22 डिसेंबरपासून कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत लाल परीचे चाक धावायला सुरुवात होईल, असे वाटत असेल, तर थांबा… कारण, संघटनेने संप मागे घेण्याची घोषणा केली असली, तरी एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.. त्यामुळे नेमके किती कर्मचारी कामावर रूजू होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

एसटी महामंडळाचे अध्यक्ष, परिवहन मंत्री अनिल परब, एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि एसटी संपाची नोटीस देणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी मंत्रालयात बैठक झाली. बैठकीनंतर कर्मचारी संघटना संपातून माघार घेत असल्याची घोषणा गुजर यांनी केली.

Advertisement

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याबाबत न्यायालयाने नेमलेली त्रिसदस्यीय समिती जो निर्णय घेईल, तो एसटी महामंडळ नि एसटी कर्मचारी संघटना, अशा दोन्ही बाजूंनी मान्य करण्यात येईल, असे बैठकीत ठरले.. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची एसटी कर्मचारी संघटनेची मागणी होती. त्यावरही चर्चा करण्याची तयारी दर्शवल्याचे परब यांनी सांगितले.

Advertisement

संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. त्यावर कर्मचारी आगारात रूजू झाले नि एसटीची सेवा सुरू झाल्यानंतर कारवाया मागे घेण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले. गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे परब म्हणाले…

Advertisement

गुजर म्हणाले, की महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने २१ ऑक्टोबरला संपाची नोटीस दिली होती. संप शांततेत झाला, त्याला गालबोट लागले नाही. १७ डिसेंबर रोजी शरद पवार यांच्याशीही चर्चा झाली. विलिनीकरणाच्या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत. मात्र, हा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्यामुळे त्याबाबत जो निर्णय येईल, तो आम्हाला मान्य आहे.

Advertisement

दरम्यान, गुजर यांनी संपातून माघार घेतल्याची घोषणा केल्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला.. आझाद मैदानावरील एसटी कर्मचारी आणि लढा विलिनीकरणाचा समितीचे सदस्य सतीश मेटकरी यांनी संप मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. एसटीच्या २८ कर्मचारी संघटना विसर्जित केल्या असून, आता कर्मचारी उत्स्फूर्तपणे संपात सहभागी होत असल्याचे मेटकरी म्हणाले.

Advertisement

महागाईच्या दिवसात खुशखबर..! खाद्यतेल होणार स्वस्त; पहा, केंद्र सरकारने कोणता निर्णय घेतलाय
पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होणार का..? ; जागतिक बाजारातील घडामोडींकडे तेल कंपन्यांचे दुर्लक्ष; जाणून घ्या, कच्चे तेलाचे दर किती घटले

Advertisement
Advertisement

Leave a Reply