मुंबई : सर्दी-खोकला झाला असेल, तर सरसकट कफ सिरप देण्यात येतो. त्यासाठी बऱ्याचदा डाॅक्टरांचा सल्लाही घेतला जात नाही. काही जण तर नशा करण्यासाठीही कफ सिरफ घेत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.. त्यासाठी मोठ्या प्रमाणात घरात कफ सिरपच्या बाटल्या आणून ठेवल्या जातात. औषध विक्रेत्यांचाही धंदा होत असल्याने तेही डाॅक्टरांच्या चिठ्ठीची मागणी करीत नाहीत..
घरात कुणालाही खोकला किंवा कफ झाला, की डॉक्टरांकडे नेण्याऐवजी, त्यांचा सल्ला घेण्याऐवजी घरातील हे कफ सिरफ दिले जाते.. मात्र, असे औषध देणे काही वेळा जिवावरही बेतण्याचीही शक्यता असते. नव्हे, प्रत्यक्ष हे कफ सीरफ तीन लहान चिमुकल्यांच्या जिवावर बेतल्याची घटना दिल्लीत घडलीय..
कफ सिरपच्या दुष्परिणामामुळे दिल्लीतील तीन लहान मुलांचा मृ्त्यू झाल्याचा प्रकार नुकताच समोर आलाय. दिल्ली सरकारच्या मोहल्ला क्लिनिकमध्ये १६ मुलांना हे कफ सिरप देण्यात आले होते. मात्र, औषध दिल्यानंतर अचानक या सर्वांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना कलावती सरन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यातील ३ जणांचा मृत्यू झाला.
औषधावर बंदी
दरम्यान, सेंन्ट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंन्ट्रोल ऑर्गनायझेशनने या मुलांना देण्यात आलेल्या सिरपची तपासणी केली असता, अतिशय खालच्या दर्जाचे सिरप या लहान मुलांना देण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे या सिरपवर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सिरपचे नाव आहे, डेस्ट्रोमेथाॅफन..(dextromethophan).. तुम्हीही डाॅक्टरांचा सल्ला न घेता, हे औषध आपल्या घरातील मुलांना देत असाल, तर तात्काळ त्याचा वापर थांबवावा, तसेच डॉक्टरांनीही हे कफ सिरप देऊ नये, अशी सूचना देण्यात आली आहे.
दरम्यान, याआधीही या कफ सीरप औषधाचे दुष्परिणाम समोर आले होते. मात्र, त्यातून एवढी मोठी हानी झालेली नव्हती. मात्र, आता हे औषध तीन लहान मुलांच्या जिवावर बेतल्याने त्यावर तातडीने बंदी घालण्यात आली आहे..
महागाईच्या दिवसात खुशखबर..! खाद्यतेल होणार स्वस्त; पहा, केंद्र सरकारने कोणता निर्णय घेतलाय
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी..! परीक्षेबाबत बोर्डाने घेतला महत्वपूर्ण निर्णय..