Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार शेतकऱ्यांपुढे पुन्हा एकदा झुकले..! आणखी एक मोठा निर्णय रद्द करावा लागला..

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या वर्षभर सुरु असलेल्या आंदोलनामुळे अखेर मोदी सरकारला तीन नवे कृषी कायदे मागे घ्यावे लागले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोदी सरकारला शेतकऱ्यांपुढे झुकावे लागल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मोठ्या विरोधामुळे कृषी कायद्यांपाठोपाठ आणखी एक महत्त्वाचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.

Advertisement

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकार ‘वीज दुरुस्ती विधेयक-2021’ सादर करणार होते. या विधेयकात विजेबाबत अनेक महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. मात्र, काही राज्यांनी त्याला विरोध केला आहे.. या विधेयकानुसार, वीजबिलावर कंपन्यांना देण्यात येणारी सबसीडी बंद करण्यात येणार होती. सबसिडी बंद झाल्यानंतर त्याची वसूली वीज वितरण कंपन्यांनी ग्राहकांकडून सुरु केली असती. वीज पुरवठा कंपन्यांना देण्यात येणारी सबसिडी बंद करुन ती थेट ग्राहकांच्या खात्यावर जमा करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. मात्र, त्याला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. त्यामुळे सध्या तरी मोदी सरकारने हा विषय लांबणीवर टाकला आहे.

Advertisement

शेतकऱ्यांचा विरोध का..?
केंद्र सरकार घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांच्या खात्यात सबसीडी जमा करीत होते, त्याच धर्तीवर वीजबिलाची सबसिडीही वीज पुरवठा कंपन्यांना न देता, थेट ग्राहकांच्या खात्यावर जमा करण्याचा विचार शासनाचा होता. मात्र, मागील काही दिवसांपासून मोदी सरकारने ग्राहकांना गॅसवर देण्यात येणारी सबसीडी बंद केली. त्यामुळे ग्राहकांवर त्याचा मोठा भुर्दंड पडला आहे. तसाच निर्णय घेऊन वीजबिलावर देण्यात येणारी सबसीडीही बंद करण्यात येईल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला असून, त्यामुळे हा प्रस्ताव लांबणीवर गेला आहे.

Advertisement

दरम्यान, मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती, मात्र आता त्यालाही कर्मचाऱ्यांचा विरोध होताना दिसत आहे. त्यामुळे हा प्रस्तावही आता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

बाब्बो.. फक्त काही सेकंदात विकले गेले सगळे स्मार्टफोन; पहा, कोणत्या चीनी कंपनीने केलीय कमाल
दक्षिण आफ्रिका क्रिकेटचा मोठा निर्णय; कोरोनामुळे ‘त्या’ क्रिकेट सामन्यांबाबत घेतलाय ‘हा’ निर्णय

Advertisement
Advertisement

Leave a Reply