नवी दिल्ली : पाकिस्तानची राजधानी असणारे कराची शहर भीषण बाॅम्बस्फोटाने चांगलेच हादरले. या बाॅम्बस्फोटात 16 लोकांचा मृत्यू झाला असून, 15 जण जखमी झाले आहेत. स्फोटाची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन दलाने घटनास्थळी धाव घेतली. भीषण स्फोटाने इमारतीचा मोठा भाग कोसळला आहे. आपत्कालिन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळाली.
कराचीतील एका बँकेच्या इमारतीखाली हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी अजून स्फोटाचे ठोस कारण सांगितलेले नाही. स्फोटाच्या कारणांचा तपास करण्यासाठी तज्ज्ञांच्या एका टीमलाही पाचारण करण्यात आले होते. या भयाण स्फोटात 16 जणांनी जीव गमावला असून, 15 जण जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार कराची इथल्या शेरशाह परिसरात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पहिला स्फोट झाला. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरु असताना दुसरा स्फोट झाला. गॅस लिक झाल्यामुळे हा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिथे हा स्फोट झाला, ती इमारत अनधिकृतपणे बांधण्यात आली होती. नोटीस देऊनही इमारत रिकामी न केल्याने लोकांना जीव गमवण्याची वेळ आल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उपचारासाठी दाखल केल्यानंतर काहींचा मृत्यू झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. स्फोटाच्या ठिकाणीही आणखी काही मृतदेह सापडण्याची शक्यता आहे. त्यात जे गंभीर जखमी आहेत, त्यांना रुग्णालयाती अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. हा स्फोट एवढा भयानक होता, की परिसरातील इमारतींच्या खिडक्याही स्फोटामुळे फुटल्या आहेत. बाजुला उभे असलेल्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.
आरोग्य टिप्स : रिकाम्या पोटी या तीन गोष्टी खा.. होणार नाही ऍसिडिटी
अर्र.. महागाईने दिलाय आणखी एक धक्का..! आता सीएनजी आणि पीएनजी इंधनाचे दर वाढले; जाणून घ्या, काय आहे परिस्थिती