मुंबई : देशातील ई-कॉमर्स बाजारपेठेतील वर्चस्वावरून अॅमेझॉन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कायदेशीर लढाई सुरु आहे. अॅमेझॉनने फ्युचर ग्रुपमधील फ्युचर कुपन्स प्रा. लिमिटेड कंपनीसोबत २०१९ मध्ये २०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली होती. मात्र, त्यावरुन गेल्या काही दिवसांपासून कायदेशीर वाद पेटला आहे..
अशात अमेझाॅनसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलीय.. नोव्हेंबर 2019 मध्ये, भारतीय स्पर्धा आयोगाने अॅमेझॉनला फ्युचर कूपनमधील 49 टक्के भाग खरेदी करण्याची परवानगी दिली. मात्र, नंतर फ्युचर रिटेल लिमिटेडच्या (Future Retail Limited) स्वतंत्र संचालकांनी स्पर्धा आयोगाकडे याचिका दाखल केली. त्यात म्हटलेय, की आयाेगाची परवानगी मिळविण्यासाठी अॅमेझॉनने चुकीची माहिती सादर केली. त्यामुळे फ्युचर कूपनमधील गुंतवणुकीसाठी अॅमेझॉनला दिलेली मान्यता रद्द करण्याची मागणी केली होती.
फ्युचर कंपनीच्या याचिकेवर सुनावणी होऊन भारतीय स्पर्धा आयोगाने अॅमेझॉन आणि फ्युचर ग्रुप यांच्यात २०१९ मध्ये झालेल्या व्यवहाराला स्थगिती दिली. तसेच अॅमेझॉनवर २०० कोटींचा दंडही ठोठावला. स्पर्धा आयोगाच्या निर्णयामुळे अॅमेझॉनला मोठा दणका बसल्याचे मानले जात आहे.
स्पर्धा आयोगाने आपल्या ५७ पानी निकालात अॅमेझॉनवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. अॅमेझॉनने फ्युचर ग्रुपसोबत केलेल्या व्यवहाराबाबत चुकीची माहिती सादर केल्याचा ठपका आयोगाने ठेवला आहे. त्यापोटी अॅमेझॉनवर २०० कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने अॅमेझॉनला या व्यवहाराबाबत दोन आठवड्यांत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यापाठोपाठ स्पर्धा आयोगाने अॅमेझॉनला दणका दिला आहे.
होऊ दे खर्च..! कोरोना काळातही लोकांची जोरदार खरेदी सुरू; जाणून घ्या, काय आहे खरे कारण
आजची रेसिपी : सकाळच्या नाश्त्यात चमचमीत खायचेय तर बनवा मसाला चीज टोस्ट