Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ओबीसी प्रवर्गातील स्थगित जागांसाठी नव्या वर्षात निवडणुक, निवडणुक आयोगाकडून तारखा जाहीर..!

मुंबई : राज्यातील 106 नगरपंचायती व दोन जिल्हा परिषदांच्या स्थगित केलेल्या जागांवर 18 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी प्रवर्गाच्या जागा आता सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होईल. उर्वरित जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होईल; परंतु मतमोजणी एकाच दिवशी 19 जानेवारी 2022 रोजी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) दोन दिवसांपूर्वी ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाला स्थगिती दिली होती. तसेच 106 नगरपंचायतींच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) घेण्याचा आदेश दिला होता. राज्य सरकारने तीन महिन्यांत ओबीसी आरक्षणासाठीचा डेटा तयार करण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते.

Advertisement

‘ओबीसीं’चा इम्पेरिकल डेटा गोळा होईपर्यंत सध्याच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारने केली होती. तसा ठरावही कॅबिनेटच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. मात्र, निवडणूक आयोगाने तत्पूर्वीचीच निवडणुकांची तारीख जाहीर करुन राज्य सरकारच्या ठरावाला केराची टोपली दाखवली.

Loading...
Advertisement

राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. शिवाय 4 महापालिकांतील 4 रिक्त पदे, 4554 ग्रामपंचायतींमधील 7130 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर रोजी मतदान होणार होते.

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार आता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ओबीसी प्रवर्गाच्या जागा आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाल्या आहेत. त्यामुळे या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी संबंधित ठिकाणी सोडत काढण्यात येणार आहे.

Advertisement

आरोग्य टिप्स : रिकाम्या पोटी या तीन गोष्टी खा.. होणार नाही ऍसिडिटी
संशोधनातील निष्कर्ष : आईने अधिक स्मार्टफोन वापरल्याने मुलावर होतो असा परिणाम

Advertisement
Advertisement

Leave a Reply