Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारकडून मोठ्या प्रमाणात तूर आयात.. शेतकऱ्यांच्या तुरीचे काय होणार…?

पुणे : खरीपातील शेवटचे पीक म्हणजे, तूर..! सध्या शेतशिवारात हार्वेस्टरच्या माध्यमातून तूर काढणीच्या कामाला वेग आला आहे… काही ठिकाणी मजूरांच्या साहाय्यानेही तूर काढणी सुरु आहे.. नवी तूर बाजारात येण्यास सुरुवात झाली असली, तरी शेतकऱ्यांचे लक्ष तुरीच्या दरावर लागले आहे..

Advertisement

तूरीच्या पिकातून तरी हातात घामाचे दाम येतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र, मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे तुरीच्या दरावरही चिंतेचे ढग कायम आहेत. कारण, आतापर्यंत 4 लाख 42 हजार टन तुरीची आवक झाली आहे. शिवाय मोदी सरकारने एप्रिल ते नोव्हेंबर या काळात 4 लाख 27 हजार टन तूरीची आयात केली.

Advertisement

गतवर्षीचा साठा आणि यंदाची आवक, यामुळे तुरीचे दर कोसळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.. आता कु़ठे बाजारात तुरीची आवक सुरु झालेली असतानाही, हमीभावापेक्षाच सध्या तुरीला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत.

Advertisement

वातावरण बदलाचा फटका
महाराष्ट्र नि कर्नाटकात मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक घेतले जाते. या दोन्ही राज्यांत तब्बल 50 लाख हेक्टरवर तुरीचा पेरा झालाय. सुरवातीला तूरीचे पीक बहरात होते. अतिवृष्टीचाही पिकावर फारसा परिणाम झालेला नव्हता, पण ऐन काढणीच्या आधी अवकाळी पाऊस नि ढगाळ वातावरणामुळे शेंग पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट होत आहे. दोन्ही राज्यांमध्ये 44 लाख टन उत्पादन होईल, असा अंदाज होता. मात्र, त्यात घट होऊन 30 लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Advertisement

तुरीचे दर वाढणार का..?
नाफेडने तुरीला 6300 रुपये क्विंटल दर ठरवला आहे. मात्र, सध्या 6 हजारांच्या खाली दर घसरले आहेत. त्यामुळे आवक सुरु होण्यापूर्वीच हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी होत आहे.. मोदी सरकारने केलेली तुरीची आयात नि सध्याचे उत्पादन, यामुळे लवकर तुरीचे दर वाढण्याची शक्यता नाही..

Advertisement

शेतकऱ्यांनी सोयाबीनप्रमाणेच तुरीच्या साठवणूकीवर भर दिल्यास दरात वाढ होऊ शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांना आताच तूर विक्री करण्यापेक्षा साठवणूकीवर अधिक भर द्यावा, अन्यथा हमी भाव केंद्र सुरु होण्याची वाट पाहावी, असे आवाहन जाणकारांनी केले आहे..

Advertisement

वाव.. मिळालीय खुशखबर..! तर सोन्याचे भाव होतील आणखी कमी; जाणून घ्या, कोणता आहे प्रस्ताव
बाब्बो.. बँक कर्मचारी संपामुळे तब्बल ‘इतक्या’ कोटींचे व्यवहार रखडले; पहा, संपाचा कसा होतोय इफेक्ट

Advertisement
Advertisement

Leave a Reply