Take a fresh look at your lifestyle.

ग्रामसेवकाचा साईड बिझनेस..! सुटीच्या दिवशी करायचा हे खतरनाक काम…अखेर जेरबंद..

नाशिक : ‘जन्माने कोणीच गुन्हेगार नसतो, परिस्थिती त्याला या मार्गावर आणून सोडते..’ चित्रपटातील हा फेमस डायलाॅग..! अर्थात, परिस्थिती कोणाला काय करायला लावेल, हे सांगता येत नाही.. नाशिकमधून असाच एक प्रकार समोर आला.. तपासात समोर आलेल्या गोष्टी पाहून पोलिसही चक्रावून गेले… नेमका हा प्रकार होता, चला जाणून घेऊ या..
नाशिकमधील गंगापूर-आकाशवाणी टॉवर परिसरातील भाजी बाजारात 15 डिसेंबर रोजी एक जण नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवर फिरत होता. पोलिस मित्र असलेल्या नागरिकांना त्याचा संशय आला. त्यांनी तातडाने गंगापूर पोलिस ठाण्यात ही माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन या व्यक्तीला ताब्यात घेतले..
पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखे बोलू लागला.. पोलिस तपासात तो अट्टल चेनस्नॅचर असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, तो चक्क शिकाऊ ग्रामसेवक असल्याचे समोर आल्यावर पोलिसांनाही धक्का बसला.. त्याच्याविरुद्ध चेनस्नॅचिंगचे पाच गुन्हे दाखल असून, पोलिसांनी त्याच्याकडून 4 लाख 94 हजार 859 रुपये किमतीच्या सोन्याच्या 11 बांगड्या जप्त केल्या आहेत.
ग्रामसेवक म्हणून नोकरीला असला, तरी सुटीच्या दिवशी तो गेल्या अनेक महिन्यांपासून चेनस्नॅचिंग करीत असल्याचे चौकशीतून समोर आलं. विपुल रमेश पाटील, असे त्याचे नाव आहे.. चांदवडमध्ये तो शिकाऊ ग्रामसेवक म्हणून नोकरीला आहे.
कशामुळे गुन्हेगारीकडे वळला…?
कोरोना काळात आरोपी विपुल पाटील याने 14 लाख रुपयांचं कर्ज घेतले होते. नोकरीतून मिळणाऱ्या पगारातून हे कर्ज फेडता येणार नसल्याचे त्याला माहित होते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी त्याने साईड बिझनेस सुरु केला, तो म्हणजे सोनसाखळी चोरण्याचा.. गेल्या काही दिवसांपासून त्याने अनेकांना अशा प्रकारे लुटल्याचे समोर आलेय.. कर्ज फेडण्यासाठी आपण हे ‘उद्योग’ करीत असल्याची कबुली त्याने दिली.

गंगापूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्याकडून 11 तोळे वजनाच्या 4 लाख 94 हजार 859 रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने,  20 हजार रुपये किमतीची दुचाकी, असा 5 लाख 14 हजार 859 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त केला आहे.

Advertisement

कोंबडी आधी की अंडे….? अखेर या प्रश्नाचे उत्तर समोर आलेच.. ब्रिटनमध्ये संशोधन
‘अ‍ॅट्रोसिटी’ कायद्याबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय, गुन्हा कधी दाखल करता येणार, वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply