Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बीडकरांचा हिरमोड..! नगर ते आष्टी रेल्वे चाचणीत पडला मीठाचा खडा..नमनालाच विघ्न..!

अहमदनगर : बीडकरांचे अनेक वर्षांचे रेल्वेचे स्वप्न साकार होताना दिसत आहे. कित्येक वर्षांची तपश्चर्या फळाला आल्याचे दिसत आहे. नगर ते आष्टी रेल्वेसाठी गेली अनेक वर्षे बीडकरांनी प्रतीक्षा केली. अनंत अडचणींवर मात करीत हा रेल्वे मार्ग तयार झाला.. त्यावरुन दोन वेळा इंजिन चाचणीही घेण्यात आली.. त्यामुळे या मार्गावरुनकधी एकदा रेल्वे धडाडत जाते, नि कधी हे चित्र डोळे भरुन पाहू, असे बीडकरांना झाले आहे…

Advertisement

रेल्वे इंजिनची चाचणी झाल्यानंतर आज (ता. 17) हायस्पीड रेल्वेची चाचणी केली जाणार होती. मात्र, मध्येच कुठेतरी माशी शिंकली नि तांत्रिक अडचणीमुळे ही चाचणी रद्द करावी लागली. त्यामुळे बीडकरांचा मोठा हिरमोड झाला आहे.

Advertisement

नगर ते आष्टी या मार्गावर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रेल्वे इंजिन चाचणीसाठी फिरत होते, पण रेल्वे कधी धावणार? अशी उत्सुकता सर्वांना होती. अखेर त्यासाठीही मुहूर्त ठरला. अहमदनगर ते आष्टी या रेल्वेमार्गावर १७ डिसेंबरला हायस्पीड रेल्वे धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली होती.

Loading...
Advertisement

रेल्वे सुरक्षा आयोगाचे मनोज अरोरा, मुख्य अधिकारी मनोज शर्मा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उपमुख्य अभियंता (बांधकाम नगर), विजयकुमार राय, सोलापूरचे चंद्रभागा सिंग, अहमदनगर येथील रेल्वे अधिकारी एस. सुरेश यांच्या उपस्थितीत सोलापूरवाडी ते आष्टी मार्गावर झालेल्या कामाचे उद्घाटनही होणार होते.

Advertisement

आता कधी होणार चाचणी..?
मात्र, मध्येच काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने हायस्पीड रेल्वेची चाचणी रद्द करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली. नमनालाच विघ्न आल्याने बीड जिल्हावासीयांचा पुरता हिरमोड झाला. दरम्यान, आता पुढच्या आठवड्यात 21 किंवा 22 डिसेंबरला हायस्पीड रेल्वे धावणार असल्याची माहिती मिळाली.

Advertisement

‘अ‍ॅट्रोसिटी’ कायद्याबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय, गुन्हा कधी दाखल करता येणार, वाचा..
कोरोनाच्या काळात लग्नाची पद्धतही बदलली.. पहा काय झाले बदल

Advertisement
Advertisement

Leave a Reply