मग त्या शिक्षकांवर गंडांतर..! बाब्बो, ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
पुणे : राज्यातील शाळांबाबत एक महत्वाची बातमी आहे.. ठाकरे सरकार कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येतेय.. त्यासाठीच्या हालचाली शासनाने सुरु केल्या आहेत. या शाळ बंद केल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे. तसेच त्यांच्या वाहतुकीची व्यवस्थाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले..
दरम्यान, भाजप-शिवसेना युती सरकार असतानाच कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा विचार सुरु झाला होता. शासकीय खर्चात बचत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यावेळी विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या नेत्यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली होती. दरम्यान, आता महाविकास आघाडी सरकारनेच युती शासनाच्या पावलावर पाऊल ठेवत 10 किंवा 20 पेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. नगर, अमरावती, पालघर, नंदूरबार, कोल्हापूर, अकोला, नाशिक, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यातील शाळांचा त्यात समावेश असल्याचे समजते.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, शाळांचे क्लस्टर तयार करावे लागणार आहे. त्यातून शाळा बंद करण्याचे धोरण राबवले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 3187, तर शहरी भागातील 464 शाळा बंद होणार आहेत. त्याचा फटका 16 हजार 334 मुलांना बसणार आहे. दरम्यान, सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत असले, तरी त्याला आतापासूनच विरोध सुरु झाला आहे.. आप पालक युनियनचे मुकुंद किर्दत यांनी स्पष्ट शब्दांत महाविकास आघाडी सरकारच्या या धोरणाचा विरोध करणार असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, की 1 ते 3 किमी अंतरात शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे काम आहे. शाळा उपलब्ध नसल्यास मुलांना वाहतूक व्यवस्था पुरवावी, असे कायदा सांगतो. परंतु शिक्षण हक्क कायद्याचा उलटा अर्थ लावत वाहतूक व्यवस्था देऊन, सुरु शाळा बंद करण्याचे धोरण शिक्षण विभाग अवलंबत आहे. ही कृती शिक्षणाच्या मुलभूत हक्काविरोधात आहे.
सावध व्हा.. शेतकऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा..! पाहा कोणी दिलाय गंभीर इशारा..
एअर होस्टेससारख्याच आता रेल्वेतही असणार ट्रेन होस्टेस.. जाणून घ्या कोणत्या ट्रेनमध्ये असेल ही सुविधा