नगर : शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.. काही दिवसांपूर्वी अगदी 10 रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोला आता सोन्याचा दर आला आहे.. सध्याच्या घडीला टोमॅटोला चक्क ८० रुपये प्रति किलो (Tomato Price) किंमत मिळत आहे. टोमॅटोचे घटलेले उत्पादन नि मागणीत झालेल्या वाढीमुळे ही दरवाढ झाल्याचे भाजीपाला व्यावसायिकांनी सांगितले. अर्थात, या दरवाढीचा लाभ शेतकर्यांपेक्षा व्यापार्यांनाच अधिक होत असल्याचे दिसते.
यंदाच्या हंगामात अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. दिवाळीनंतर शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन केले असता, बंगाल नि अरबी समुद्रातील वातावरण बदलामुळे पुन्हा पाऊस झाला. मागचा सगळा आठवडा ढगाळ हवामान होते. त्यामुळे पिकांवर रोगराईचा प्रादूर्भाव झाला आहे.. पिकांची वाढ खुंटली. पिकावरील कीडीने शेतकरी हैराण झालाय.
वातावरण बदलाचा फटका टोमॅटो पिकालाही बसला.. मागणी कायम राहिल्याने टोमॅटोचे भाव वाढत जाऊन आज ते ८० रुपये प्रति किलोवर स्थिरावले आहेत. अर्थात शेतकऱ्यांच्या पदरात हा भाव काही मिळत नाही.. त्यामुळे शेतकरी उपाशी नि व्यापारी तुपाशी अशी स्थिती आहे. दुसरीकडे ग्राहकांनाही या दरवाढीचा फटका बसलाय… डिसेंबरअखेर भाज्यांचे दर असेच राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे..
नगरच्या टोमॅटोंना मागणी
नगरच्या टोमॅटोंना शेजारील पुणे, औरंगाबाद, नाशिक महानगरांमधून मोठी मागणी आहे.. किंमतही चांगली मिळत असल्यामुळे नगरचे शेतकरी या महानगरांमध्ये टोमॅटो विक्रीसाठी पाठवित आहेत. किरकोळ विक्रीत तीन ते चार पट भाववाढ झालीय. टोमॅटोसह अन्य भाजीपाला आणि फळभाज्यांच्या किंमतीही वाढल्यात. 40 रुपये किलोची गवार आता 60 रुपये किलो, कांदा 30 ते 60 रुपये, चंपाषष्ठीमुळे वांग्याची मागणी वाढून किंमत 35 वरून 70 रुपये किलो, तसेच शिमला मिरचीदेखील 30 रुपयांवरुन 50 रुपये किलोवर गेली आहे…
शेतकरी आंदोलनानंतर आता पुढे काय..? ; राकेश टिकैत यांनी दिलेय महत्वाचे स्पष्टीकरण
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर..! नव्या वर्षात केंद्र सरकार ‘तो’ निर्णय घेण्याची शक्यता; पहा, कर्मचाऱ्यांचा कसा होईल फायदा