मुंबई : साेयाबीन उत्पादकांसाठी मोठी बातमी आहे.. मोदी सरकारने या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय.. तो म्हणजे, सोयापेंड आयातीबाबत सध्या तरी मोदी सरकारचा कोणताही विचार नसल्याचे खुद्द वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनीच स्पष्ट केले.. तसे ट्विटही त्यांनी केले आहे.
सोयाबीन (Soybean) दराबाबत मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात चढउतार सुरु आहेत. त्यात गेल्या 15 दिवसांपासून मोदी सरकार सोयापेंड (Soypend) आयात करणार असल्याची चर्चा होती. मात्र, मार्च-2022 पर्यंत सोयापेंडची आयात केल्यास पुन्हा एकदा सोयाबीनचे दर कोसळण्याची भीती व्यक्त होत होती.. त्यामुळे सोयापेंडच्या आयातीला खासदार डॉ. अमोल कोल्हे, शेतकरी नेते पाशा पटेल यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरुवातीपासून विरोध केला होता.
दरम्यान, शेतकरी नेते पाशा पटेल यांनी वाणिज्य मंत्री गोयल यांची भेट घेऊन सोयापेंड आयात केल्यास शेतकऱ्यांचे कसे नुकसान होईल, हे पटवून दिले होते. त्यावर गोयल यांनीही सोयापेंड आयातीचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले. एवढेच नाही, तर त्यांनी यासंदर्भात ट्विटही केले. त्यामुळे आता केंद्र सरकार सोयापेंडची आयात करणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने बाजारपेठेत त्याचे काय परिणाम होतात, याकडे लक्ष लागले आहे..
यंदा खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली होती. दरवाढ होण्याच्या आशेवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करण्यावर भर दिला होता. अखेर सुरुवातीला 4500 रुपयांवर असलेले सोयाबीन दिवाळीनंतर 6800 रुपये क्विंटलवर गेले होते.
साेयाबिनच्या दरात वाढ झाल्याने पोल्ट्री व्यावसायिकांना कोंबड्यांसाठी जादा दराने खाद्य विकत घ्यावे लागत होते. त्यामुळे सोयापेंडची आयात करुन सोयाबीनचे दर नियंत्रणात ठेवण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात होती. त्यानुसार ऑगस्टमध्ये 12 लाख टन सोयापेंडची आयात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार 6 लाख 50 हजार टन आयातही झाली. आता उर्वरित सोयापेंड आयात करण्याची मागणी होत असतानाच मंत्री गोयल यांनीच सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय.
Cryptocurrency News : ‘क्रिप्टो’वाल्यांनो सावधान..! तर तुमची होऊ शकते थेट जेलवारी..!
चीनला पुन्हा झटका.. अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलियानेही घेतलाय ‘तो’ निर्णय; पहा, काय सुरू आहे जागतिक राजकारणात