Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार आणखी चार सरकारी कंपन्या विकणार, आता कोणत्या कंपन्यांचा नंबर लागणार, वाचा..

नवी दिल्ली : मोदी सरकारने सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. सरकारी कंपन्यांचे निर्गुंतवणूकीकरण करुन त्या माध्यमातून मोदी सरकारने 1.75 लाख कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. सरकारला आतापर्यंत 9 हजार 330 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात यश आले आहे.

Advertisement

एअर इंडियानंतर मोदी सरकारने नुकतीच सरकारी मालकीच्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या विक्रीला मंजूरी दिली. ही कंपनी नंदल फायनान्स अॅण्ड लिजींग कंपनीला 210 कोटींना विकण्यात येणार आहे. त्यानंतर मोदी सरकार आता येत्या मार्चअखेरपर्यंत आणखी 4 सरकारी कंपन्या विकणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यात शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, बीईएमएल, पवन हंस आणि निलांचल इस्पात या कंपन्यांचे खासगीकरण केले जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Advertisement

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही सरकारच्या धोरणात्मक विक्री योजनेतील सर्वात मोठी कंपनी आहे. पुढील आर्थिक वर्षात भारत पेट्रोलियम विक्रीचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते. सोबतच आयडीबीआय बँक आणि एका विमा कंपनीचेही खासगीकरण केले जाणार आहे. भारत सरकारने २ सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याची योजना असल्याचे जाहीर केली आहे. इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या त्या बँका असण्याची शक्यता आहे.

Advertisement

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये व्यवस्थापन हस्तांतरणासह शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील ६३.७५ टक्के भागीदारी धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी निविदा आमंत्रित केल्या होत्या. सध्याच्या बाजार मूल्यानुसार, शिपिंग कॉर्पोरेशनमधील सरकारची हिस्सेदारी सुमारे २,५०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

हेलिकॉप्टर सेवा पुरवठादार कंपनी ‘पवन हंस’चे व्यवस्थापन, नियंत्रण सोपविण्यासह धोरणात्मक विक्रीसाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मोदी सरकारने निविदा मागविल्या होत्या. याआधी दोन वेळा पवन हंस विक्रीचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. पवन हंसमध्ये ५१ टक्के आणि तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात (ONGC) ४९ टक्के हिस्सा सरकारचा आहे. सरकारच्या हिस्सेदारीसह कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकण्याचा निर्णय ओएनजीसीने घेतला होता. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (DIPAM) प्राथमिक माहिती मेमोरँडम (PIM) जारी केले होते.

Advertisement

बाब्बो : नऊ वर्षांचा मुलगा सोशल मीडियावर करत होता असे कृत्य पोलिसही झाले थक्क
अर्र.. म्हणून ‘त्या’ देशात केलाय लॉकडाऊन; लोक अनुभवताहेत कोरोनाचे ‘जुने दिन’; पहा, काय आहे परिस्थिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply