मुंबई : ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार तरुण, पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत, त्यातून शाश्वत अर्थाजन व्हावे, यासाठी पशुसंवर्धन विभागाने विविध योजना आणल्या आहेत. त्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा प्रयत्न आहे.
पशुसंवर्धन विभागाने वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या लाभासाठीची प्रक्रिया अधिक पारदर्शक केली आहे. त्यासाठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेत गेली तीन वर्षे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु केली आहे. त्याबरोबरच जिल्हास्तरीय योजनांसाठी संगणक प्रणाली लागू केली आहे..
पशुसंवर्धन विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी 4 ते 18 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी तातडीने अर्ज करण्याच आवाहन करण्यात आले आहे..
दरम्यान, एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी पुढील 5 वर्षांपर्यंत लागू ठेवण्याची सोय सरकारने केली आहे. त्यामुळे पशुपालकांना वारंवार अर्ज करावा लागत नाही.. शिवाय योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता वाढते.. प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार योजनेचा लाभ कधीपर्यंत मिळेल, हे कळू शकते. लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येते.
नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1 हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 + 3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2021-22 या वर्षात राबविली जाणार आहे.
पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
बाब्बो : नऊ वर्षांचा मुलगा सोशल मीडियावर करत होता असे कृत्य पोलिसही झाले थक्क
‘ओमिक्रॉन’ बाबत आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलीय महत्वाची माहिती; नागरिकांनाही केलेय ‘हे’ आवाहन