Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. कांदा-द्राक्ष उत्पादकांची उडाली झोप..! पहा नेमके काय आहे कारण

पुणे : अवकाळी पावसामुळे सध्या बळीराजाच्या काळजाचा ठेका चुकला आहे. काढणीला आलेला किंवा काढणीसाठी तयार कांदा आणि द्राक्षमणी यांना या अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. पावसाच्या सरींमुळे ऐन काढणीस आलेला लाल कांदा जमिनीतच सडणार असल्यामुळे बळीराजाची झोप उडाली आहे.

Advertisement

थोड्याफार प्रमाणात कांदा उत्पादित होऊन चांगल्या किंमतीला विकला जाईल असा आशावाद वाटत असतानाच ऐन थंडीत पावसाने उचल खाल्ली आहे. त्यामुळे काढणीला आलेला कांदा शेतात सदन्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे द्राक्ष बागही संकटात सापडल्याने पुणे, नाशिक, सांगली आणि सोलापूर भागातील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. पावसामुळे वातावरणातील गारवा वाढून थंडीत वाढ झाल्यास द्राक्ष मण्यांना तडा जाण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरीही हवालदिल झाले आहेत. आज सकाळपासून पावसाची संततधार (Rain in mumbai, pune, Nashik अंड maharashtra) सुरु आहे. मुसळधारही नाही अन पूर्णपणे पाऊस बंदही होत नाही अशी स्थिती आहे.

Loading...
Advertisement

थंडीत पाऊस सुरू झाल्याने मिम्सचाही सुकाळ आलेला आहे. सोशल मीडियात व्हायरल (memes viral in social media) केल्या जाणाऱ्या मिम्स मनोरंजन करीत आहेत. दुसरीकडे शेतकरी हवालदिल झालेला आहे. यामध्ये कुणी आजपासून सुरु झालेल्या शाळांच्या पार्श्वभूमीवर जून महिन्याची आठवण काढत आहे. तर कुणी शेतात कांदा लागवड (Onion bowing) सुरु आहे. आता पावसाची कुठलीही गरज नसल्याचे सांगत ‘मौसम मस्ताना गरज नसताना कांदे लागवड सुरु असताना असे म्हणत छानसे यमक जुळवून ते व्हायरल करीत आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply