वयाच्या साठीनंतर मजुरांना मिळणार पेन्शन, मोदी सरकारच्या या योजनेत लगेच करा नोंदणी..!
नवी दिल्ली : असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी आनंदाची बातमी आहे. मोदी सरकार अशा सर्व मजुरांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा पेन्शन देण्याच्या विचारात आहे… वयाच्या साठीनंतर कामगारांना त्यांच्या उतार वयात कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये, त्यांचे वृद्धत्व सुखा-समाधानाने जावे. म्हातारपणातही त्यांना काम करण्याची गरज पडू नये, यासाठी मोदी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
याबाबत कामगार मंत्रालयाने माहिती दिली. त्यानुसार, असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. त्यात सहभागी होण्यासाठी कामगारांना नोंदणी करावी लागणार आहे.. योजनेत नोंदणी केलेल्या असंघटीत क्षेत्रातील मजुरांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे..
कामगारांना देण्यात येणाऱ्या या पेन्शनचा खर्च देणगीदारांच्या पैशातून भागवला जाणार आहे. या योजनेसाठी देणगी देण्याचे आवाहन कामगार मंत्रालयाने केले आहे. ज्या देणगीदाराची या योजनेत सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांच्याकडून एकरकमी 36 हजार रुपये घेण्यात येतील. या देणगीमधून आलेला सर्व पैसा पंतप्रधान श्रमयोगी मानधनमध्ये (पीएमएसवायएम) जमा केला जाणार आहे. त्यातूनच असंघटीत क्षेत्रातील मजुरांना पेन्शन देण्यात येईल.
थोडक्यात, उज्वला गॅस योजनेंच्या धर्तीवरच ही योजना असणार आहे.. उज्वला गॅस योजनेत गरीबांना अधिक सबसीडी मिळावी, यासाठी श्रीमतांना सबसीडी सोडण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणेच ही योजना काम करणार असल्याची माहिती कामगार मंत्रालयाने दिलीय.
योजनेला अल्प प्रतिसाद
दरम्यान, मोदी सरकारने ही योजना जाहीर केलेली असली, तरी कामगारांचा त्याला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. गेल्या ऑक्टोबर महिन्यात केवळ 35 मजुरांनी या योजनेसाठी नोंदणी केली, तर सप्टेंबरमध्ये ही संख्या फक्त 85 एवढी होती. नोंदणीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत केवळ 2366 मजुरांनी या योजनेसाठी नोंदणी केल्याचे दिसते. असंघटीत क्षेत्रातील मजुरांमध्ये पुरेशी जनजागृती झाली नसल्याचेच या आकडेवारीवरून समोर येतेय.
शेअर बाजार खुलला..! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी, जाणून घेण्यासाठी वाचा..
एटीएममधून पैसे काढण्याचा नियमांत बदल, बॅंकेने केला महत्वपूर्ण बदल..!