मुंबई : दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ‘ओमीक्रॉन’ विषाणूमुळे जगभर खळबळ उडालीय. त्याचा शेअर बाजारातही परिणाम दिसून आला.. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होत होती. मात्र, आजच्या (ता. 30) दिवसाची सुरुवात चांगली झाली.
सध्या सेन्सेक्स 600 अंकांच्या वाढीसह ट्रेड करीत आहे. सकाळी 9.45 वाजता सेन्सेक्स 670.24 अंकांनी किंवा 1.17 टक्क्यांनी वाढून 57,930.82 वर ट्रेड करीत होता. याआधी बीएसईचा सेन्सेक्स 238.58 अंकांनी वाढून 57,499.16 वर उघडला गेला. त्याच वेळी, NSE चा निफ्टी 51.35 अंकांच्या वाढीसह 17,105.30 वर उघडला गेला.
संमिश्र जागतिक संकेतांमध्ये प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 133.82 अंक किंवा 0.23 टक्क्यांच्या वाढीसह 57394.40 च्या पातळीवर दिसला, तर निफ्टी 203.20 अंकांनी किंवा 1.19 टक्क्यांनी घसरून 16850.80 च्या पातळीवर पाहायला मिळाला.
बीएसईवर या स्टॉक्समध्ये तेजी
Power Grid, Titan, SBI, Bajaj Finance, Bajaj Finserv, Axis Bank, Tech Mahindra, HCL Tech, Infosys, TCS, ITC, Sun Pharma, IndusInd Bank, NTPC, ICICI Bank, Maruti, LT.
स्टार हेल्थचा आयपीओ आज येणार
दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेल्या स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स (Star Health and Allied Insurance) कंपनीचा ‘इनिशियल पब्लिक ऑफर’ (IPO) आज (ता. 30 नोव्हेंबर) ओपन होत आहे. सोमवारी कंपनीने सुरुवातीच्या शेअर विक्रीपूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून 3217.13 कोटी रुपये उभे केले आहेत. 2021 मधील हा तिसरा सर्वात मोठा पब्लिक इश्यू असल्याचे सांगितले जाते.
भारत-न्यूझीलंड कसोटी : आर. अश्विनने गोलंदाजीत केला नवा विक्रम.. कोणाला टाकले मागे
अखेर तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द, संसदेत विधेयक मंजूर, विरोधकांनी साधला मोदी सरकारवर निशाणा..