Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठाकरे सरकारचा यु टर्न, आता या शेतकऱ्यांना नाही मिळणार कर्जमाफी..!

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठाकरे सरकारने कोलांटउडी मारली आहे… कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने आता ज्या शेतकऱ्यांवर दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार नसल्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी सरकारबाबत संताप व्यक्त केला आहे..

Advertisement

भाजप (BJP) – शिवसेना (Shiv Sena) युती सरकारने त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता.. त्याला टस्सल देताना कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या काळातील थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. नियमित कर्जदारांना प्रत्येकी 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान, तर दोन लाखांवरील शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे जाहीर केले होते.

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून भाजप- शिवसेना युती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाखाची कर्जमाफी दिली होती. नियमित कर्जदारांना प्रत्येकी 25 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले होते, तसेच दीड लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांना ‘ओटीएस’च्या (एकरकमी परतफेड योजना) माध्यमातून थकबाकीची उर्वरित रक्‍कम भरलेल्यांनाही लाभ दिला.

Advertisement

दरम्यान, नंतर राज्यात सत्ताबदल झाला.. शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.. या आघाडी सरकारने फडणवीस सरकारच्या कर्जमाफीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एप्रिल 2015 ते मार्च 2019 या काळातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली. राज्यातील 36 लाख 64 हजारांपैकी 35 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभही दिला.

Advertisement

आता नियमित कर्जदारांसाठीही 11 ते 14 हजार कोटींपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान द्यावे लागणार आहे. परंतु, दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या 15 लाखांहून अधिक आहे. त्यांच्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासंदर्भात अजून काहीही निर्णय झाला नसल्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी म्हटले आहे.

Advertisement

ते म्हणाले, की महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदार कर्जदारांना कर्जमाफी मिळाली. उर्वरित पात्र शेतकऱ्यांसह नियमित कर्जदारांना प्रत्येकी 50 हजारांचा लाभ मिळेल. दोन लाखांवरील थकबाकीदारांच्या कर्जमाफीसंदर्भात काहीच निर्णय झालेला नाही.

Advertisement

जात वैधता प्रमाणपत्राबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, उमेदवारांचा असा होणार फायदा…
अखेर तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द, संसदेत विधेयक मंजूर, विरोधकांनी साधला मोदी सरकारवर निशाणा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply