मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका आरक्षित प्रवर्गातून लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे… ग्रामपंचायत, जिल्हा परिषद नि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांना आता जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १२ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी (ता. 29) हा निर्णय घेण्यात आला. लवकरच याबाबतचा अध्यादेश काढला जाणार आहे…
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद असो वा पंचायत समितीची निवडणूक.. राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तींना नामनिर्देशन पत्रासोबत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते. राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यात आरक्षित प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरताना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश हायकोर्टाने दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ ही अंतिम मुदत आहे.. अर्ज भरण्याच्या तारखेपूर्वी जातपडताळणी समितीकडे अर्ज केला असेल, पण अर्ज करताना ते प्रमाणपत्र मिळालेले नसल्यास अशी व्यक्ती निवडून आल्यानंतर १२ महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर करु शकतील. फक्त तसे हमीपत्र द्यावे लागेल. अर्थात जातप्रमाणपत्र सादर केले नाही, तर संबंधित व्यक्तीची निवड रद्द केली जाणार आहे.
महानगरपालिका, नगरपरिषद उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 12 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमडळाने घेतल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्राची चिंता वाढली : दक्षिण आफ्रिकेतून आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
…म्हणून केंद्राने राज्यांना पुन्हा दिलाय ‘हा’ इशारा; पहा, आरोग्य मंत्रालयाने काय म्हटलेय ‘त्या’ पत्रात