Take a fresh look at your lifestyle.

लग्नाच्या टिप्स : लग्नानंतर मुलींसमोर येतात या समस्या.. `त्या` अशा प्रकारे सोडवा

मुंबई : लग्न हे दोन भिन्न विचारांच्या, स्वभावाच्या लोकांमधील नाते आहे.  जे जोडल्यानंतर दोन भिन्न व्यक्तिमत्व असूनही ते एक बनतात. जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी लग्न करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात विशेषत: मुलींच्या आयुष्यात मोठा बदल घडतो. भारतीय कुटुंबांमध्ये लग्न होताच मुलींना आपले कुटुंब, आई-वडिलांचे घर सोडून पती आणि सासू-सासऱ्यांसोबत राहावे लागते.

Advertisement

त्यानंतर प्रत्येक नवविवाहित जोडप्याला अनेक बदलांना आव्हानांना सामोरे जावे लागते. तिने आपल्या जीवनातील या बदलांशी जुळवून घेतले किंवा लग्नानंतर येणाऱ्या आव्हानांना तोंड दिले तर त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकते. मात्र, यासाठी मुलींनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अगोदरच तयार राहायला हवे. तयारीसाठी, येणाऱ्या आव्हानांची पूर्व माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊ या लग्नानंतर मुलींच्या आयुष्यात काय बदल होतात, काय समस्या येऊ शकतात आणि त्यावर उपाय काय?

Advertisement

अनेक जबाबदाऱ्या : जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा तिचे नाते केवळ तिच्या आयुष्याच्या जोडीदाराशीच नाही तर सासरच्यांशीही जोडले जाते. मुलीच्या सासूला तिच्या सुनेकडून काही अपेक्षा असतात. भावजय, नणंद यांच्याकडूनही काही अपेक्षा असतात. सुरुवातीला तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. तुमच्या आवडीच्या नसलेल्या काही गोष्टीही तुम्हाला कराव्या लागतील. सून म्हणून तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या असू शकतात.

Advertisement

पतीशी जुळवून घेणे : लग्नानंतर तुम्हाला तुमच्या पतीसोबत राहण्यासाठी, त्याचे वागणे आणि सवयी समजून घेण्यासाठी वेळ लागतो. तुमच्या दोघांचे व्यक्तिमत्त्व आणि आवडीनिवडी जुळत नसतील. मात्र काही काळ तुम्हाला त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल.

Advertisement

नोकरी आणि वैयक्तिक जीवनातील संतुलन : लग्नाआधी नोकरी करत असाल तर तितकीशी जुळवाजुळव करायची गरज नाही. लग्नानंतर तुम्हाला तुमच्या कामासोबतच तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा समतोल साधावा लागेल. नोकरीबरोबर कुटुंबाचीची काळजी घेणे, घरातील कामे करणे, सासू-सासऱ्यांची काळजी घेणे इत्यादी कामे करावी लागतील. यासाठी तुम्ही या सर्व गोष्टी कशा करायच्या हे आधीच ठरवायला हवे.

Advertisement

केवळ दोघांनाच वेळ न मिळणे : लग्नानंतर अनेकदा केवळ नवविवाहित जोडप्याला एकटे राहण्याची संधी मिळणार नाही. जर तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा असेल, तर तेही कठीण होऊ शकते. यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार असले पाहिजे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply