Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी झाला स्मार्ट..! ई-पीक पाहणीचा उपक्रम यशस्वी, शेतकऱ्यांवर येणार आणखी एक जबाबदारी..

पुणे : राज्यात यंदा प्रथमच ‘ई-पीक पाहणी’चा प्रयोग खरीप हंगामात राबविण्यात आला.. सुरुवातीला याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले, पण अखेर शेतकऱ्यांनी हा प्रयोग यशस्वी करुन दाखविला. शेतकऱ्यांनीच आपल्या पीक पेऱ्याची माहिती या अॅपद्वारे भरली. त्यामुळे शेतकरीही स्मार्ट झाल्याचे या प्रयोगातून दिसून आले.

Advertisement

दरम्यान, शेतकऱ्यांनी केलेल्या ई-पीक पाहणीचा अहवाल नुकताच समोर आला असून, त्यात राज्यातील तब्बल 58 लाख 39 हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद या अॅपच्या माध्यमातून केली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता ‘ई-पंचनाम्या’चे कामही शेतकऱ्यांवरच सोपविले जाणार असल्याचे समजते.

Advertisement

खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 1 कोटी 49 लाख 73 हजार हेक्टर होते. पैकी 70 लाख हेक्टरवरील पिकांच्या नोंदी शेतकऱ्यांनी केल्या आहेत, तर 23 लाख 63 हजार शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी केली, मात्र काही कारणास्तव ती झाली नसल्याचे दिसते.. या शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याचा अंदाज आहे. मात्र, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांनी शंभर टक्के पिकांची नोंदणी केली. सर्वाधिक नोंद सोयाबीन पिकाची झाली आहे.

Advertisement

औरंगाबाद विभागातील तब्बल 8 लाख 73 हजार शेतकऱ्यांनी मोबाईलच्या माध्यमातून पिकांच्या नोंदी केल्या आहेत, तर सर्वात कमी मोबाईलचा वापर कोकण विभागातील शेतकऱ्यांनी केलेला आहे. या विभागातील केवळ 1 लाख 16 हजार शेतकऱ्यांनीच मोबाईलद्वारे पीकपाहणीच्या नोंदी केल्या आहेत..

Advertisement

शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद घेण्यासाठी यापूर्वी तलाठ्याला बांधावर जावे लागत होते. अनेकदा त्यात चालढकल होत असल्याचे समोर आले होते. अनेक वेळा पिकांच्या नोंदी न झाल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीपासून वंचितही राहावे लागले.. त्यामुळे आपल्या पिकांची शेतकऱ्यांनीच नोंद करावी, यासाठी ऑगस्ट 2021 मध्ये हा अनोखा प्रयोग राबविण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता ई-पंचनाम्याचीही जबाबदारी शेतकऱ्यांवरच सोपविण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे.

Advertisement

महागाईला तडका..! मोदी सरकार ‘जीएसटी’मध्ये वाढ करण्याच्या विचारात, असा परिणाम होणार…
होय, LPG गॅस सिलिंडरवर असतोय 50 लाखांचा विमा..! वाचा खूप महत्वाची अशी माहिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply