Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी..! एसटी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठ्या पगारवाढीची घोषणा, पगाराचे गणित कसे असेल, वाचा..

मुंबई : मागील 17 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अखेर यश आलं.. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने जाहीर केला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज (ता. 24) सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केली…

Advertisement

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत या वेळी उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात घसघशीत वाढ करण्यात आल्याची माहिती परब यांनी दिली.

Advertisement

ते म्हणाले, की ‘एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा संप चालू होता. त्यावर हायकोर्टाने त्रिसदस्यीय समिती नेमावी व या समितीने विलिनीकरणाबाबत 12 आठवड्यांत निर्णय घ्यावा, असा आदेश दिला होता.

Advertisement

एसटी विलिनीकरणाबाबत ही समितीचा जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. मात्र, संप बऱ्याच दिवसांपासून सुरु असल्याने जनतेची, विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. त्यावर सरकारतर्फे आम्ही कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याच्या निर्णय घेतलाय. ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे, अशी घोषणा परब यांनी केली.

Advertisement

कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ
1 ते 10 वर्षे सेवा- मूळ वेतनात 5 हजारांची वाढ, मूळ वेतन 12 हजार 80 वरुन आता 17 हजार 395 रुपये, तर पूर्ण वेतन 17 हजार 80 रुपयांवरुन 24 हजार 594 रुपये. साधारण 7200 रुपयांची वाढ (एकूण 41 टक्के).

Advertisement

10 ते 20 वर्षे सेवा – मूळ वेतनात 4 हजार रुपयांची वाढ. मूळ वेतन 16 हजार रुपयांवरुन 23 हजार 40 रुपये, तर पूर्ण पगारवाढ 28 हजार 800 रुपये.

Advertisement

20 वर्षाहून अधिक सेवा – मूळ वेतनात 2500 रुपये वाढ. मूळ वेतन 26 हजार होतं आणि स्थूल वेतन 37440 रुपये होतं, त्यांचा पूर्ण पगार 41040 रुपये. ज्यांचे मूळ वेतन 37 हजार आणि स्थुल वेतन 53 हजार 280 रुपये होतं. त्यांचे मूळ वेतन 39 हजार 500 होईल, तर सुधारित वेतन 56 हजार 880 रुपये होईल.

Advertisement

कर्मचारी काय म्हणतात..?
आमचा 2016 ते 2020 आणि 2020 ते 2024 असे दोन्ही करार प्रलंबित आहेत. त्यामुळे ही वेतनवाढ तर आम्हाला आपोआप मिळणारच होती. त्यामुळे हा निर्णय आम्हाला मान्य नाही. आभाळ फाटलं आहे आणि तुम्ही ठिगळं लावायला निघाला आहात… असं कुठं असतं का..? आमची विलिनीकरणाची प्रमुख मागणी आहे आणि सर्व कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत…

Advertisement

सोन्या-चांदीच्या दरात वाढ… सराफ बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..
बाब्बो… म्हणून पाकिस्तान होतोय कंगाल; कारण ऐकून वाटेल आश्चर्य; पहा, नेमके काय चाललेय शेजारी देशात..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply