Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी उपाशी, विक्रेते तुपाशी..! भाजीपाल्याची आवक घटल्याने दर वाढले..

मुंबई : अवकाळी पाऊस, ढगाळ हवामानाचा पिकांवर मोठा परिणाम झालाय.. शेतातील उभे पीक रोगराईला बळी पडले आहे.. तर दुसरीकडे काढणीला आलेल्या भाजीपाल्यावरही परिणाम झाल्याचे दिसत आहे. बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटल्याने दर वाढले आहेत. मात्र, त्याचा कोणताही थेट फायदा शेतकऱ्यांना होत नसून, किरकोळ विक्रेत्यांनाच होत आहे.

Advertisement

भाजीपाल्याच्या दरावर कुणाचेच नियंत्रण नसल्यामुळे किरकोळ विक्रेते ठरवतील तोच दर अंतिम मानला जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशालाही झळ बसत असताना, दुर्देवाने उत्पादकाच्या पदरात काहीच पडत नाही..

Advertisement

आवक घटली की दर वाढणार.. हे बाजारपेठेचे सूत्रच.. पण त्यामुळे किमान शेतकऱ्यांना तरी फायदा होणे अपेक्षित होते. मात्र, बाजारपेठेत किरकोळ विक्रेतेच आपल्या झोळ्या भरीत आहेत. मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज 580 गाड्यांची आवक झाली. त्यात टोमॅटो 50 रुपये, तर वाटाणा 100 रुपये किलोने विकला गेला. इतर भाज्यांच्या दरातही मोठी वाढ दिसून आली.

Advertisement

अतिवृष्टीमुळे पिकासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम आता दिसत आहे. टोमॅटो, वटाण्याला मोठी मागणी असतानाही, त्या तुलनेत पुरवठा होत नाही. त्यामुळे दरात वाढ होत आहे. मात्र, दरवाढीचा मलिदा मध्यस्तीच लाटत आहेत. शेतकऱ्यांना नियमित भावातच भाजीपाल्याचे पैसे मिळत आहेत. सध्या अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असली, तरी वातावरण बदलाचा परिणाम भाजीच्या आवकेवर नि पर्यायाने दरावरही झाला आहे.

Advertisement

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चही वाढलाय. त्यामुळेही भाजीपाला महागल्याचे व्यापारी सांगतात. पण किरकोळ विक्रेतेच भाजीपाल्याचा दर ठरवत आहेत. त्यावर कुणाचाच अंकूश नाही. त्यामुळे दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे, तर मध्यस्ती करणाऱ्यालाच होत आहे. दुप्पट, तिप्पट दराने ग्राहकांना भाजीपाला विकला जात आहे.

Advertisement

सोन्या-चांदीच्या दरात वाढ… सराफ बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..
अमेझाॅन, फ्लिपकार्टला दणका..! ऑनलाईन वस्तूंची खरेदी करण्यापूर्वी हे वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply