Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोन्या-चांदीच्या दरात वाढ… सराफ बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..

मुंबई : अमेरिकन फेडरल बँकेने व्याजदर कमी केल्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. मात्र, पुढील काही दिवसांत सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे. कमजोर जागतिक संकेतांमुळे सध्या सोन्याच्या किमतीत घसरण सुरूच आहे. सध्या सोन्याच्या दरात घसरण होत असल्याने लग्नसराईत सोने-चांदी खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.
सोन्या-चांदीच्या दरात आज (ता. २४) किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.. मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 0.38 टक्क्यांनी वाढून 47,616 रुपये प्रति तोळ्यावर गेले होते. गेल्या मंगळवारी 49,340 रुपयांच्या किमतीपेक्षा ही किंमत जवळपास 2,000 रुपये कमी आहे, ही दिलासादायक बाब आहे.
दरम्यान, चांदीच्या दरातही आज किंचित वाढ झाली. चांदीचा भाव 0.43 टक्क्यांनी वाढून 62,777 रुपये प्रति किलो झाला.
दरम्यान, आता सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. त्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

Loading...
Advertisement

सोन्याची शुद्धता तपासून पाहण्यासाठी सरकारने एक अ‍ॅप तयार केले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) असे त्याचे नाव आहे. या अ‍ॅप’च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही, तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल..

Advertisement
Advertisement

Leave a Reply