शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! या योजनेचे रखडलेले अनुदान राज्य सरकारकडून मंजूर..
मुंबई : भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात 2016 मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ योजना राबविण्यात आली होती. सिंचनाचे महत्व शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या योजनेला प्रतिसाद दिला. कृषी विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात होती. किमान ६० गुंठे जागा असणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याला ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत होते. सुरुवातीला ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांतील शेतकऱ्यांसाठी ही योजना होती. मात्र, पुढे योजनेचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला गेला. मात्र, शेततळ्यांची संख्या जसजशी वाढू लागली, तसे सरकारने अनुदानासाठी हात आखडता घेतला.
राज्य सरकारच्या एका घोषणेमुळे काय परिणाम होतो, हे ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून समोर आले. ज्या ग्रामीण भागात शेततळ्याची संकल्पनाही रुजलेली नव्हती, त्या शेतशिवारात शेततळ्यांचे जाळे निर्माण झाले. मात्र, ऐन वेळी सत्तांतर झाले नि नंतरच्या सरकारने तर अनुदानाकडे सपशेल दुर्लक्ष केले.
शेततळ्यासाठी अनुदान देण्याची सुरवात नाशिक जिल्ह्यापासून झाली होती. नंतर 2009 मध्ये खान्देशासाठी हा कार्यक्रम राबविण्यात आला. फक्त नंदूरबारसाठी दोन कोटी रुपये खर्च करून 400 शेततळी खोदण्याचा निर्णय घेतला. मात्र, शेततळ्याची गरज नि पाण्याचे होणारे नियोजन, यामुळे पुढे या संकल्पनेचे योजनेत रुपांतर झाले. रोजगार हमी योजनेतू 2009 ते 2012 या काळात 90 हजार शेततळी खोदण्यात आली. मात्र, नंतर ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेमुळे गावोगावी शेततळी झाली. त्यात अनुदान रखडल्याने शेतकऱ्यांना मोठी झळ सोसावी लागली.
राज्यातील शेतकरी गेल्या 4 ते 5 वर्षापासून अनुदानाच्या प्रतिक्षेत होते. शेतकऱ्यांचा सततचा रेटा नि कृषी आयुक्तांनी घेतलेली भूमिका अखेर निर्णायक ठरली. राज्यातील शेततळ्यांसाठी ठाकरे सरकारने (thakre governments) तब्बल 52 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सरकारच्या या घोषणेमुळे राज्यातील 10 हजार 744 शेतकऱ्यांना रखडलेले अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कृषी आयुक्त धीरज कुमार यांनीही या अनुदानासाठी मोठा पाठपुरावा केला. लवकरच शेततळ्याच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
खळबळजनक..! भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूला जीवे मारण्याची धमकी.. कोणी दिलीय धमकी वाचा..
उसाच्या ‘एफआरपी’चा प्रश्न हायकोर्टात..! राज्य सरकारने काय तोडगा काढलाय, वाचा..