आनंदाची बातमी..! घरगुती गॅस सिलिंडरवर पुन्हा मिळतेय सबसिडी, तुमच्या खात्यात जमा झाली का? असे तपासा…!
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत ‘एलपीजी’ म्हणजेच घरगुती गॅसचे दर (LPG price) गगणाला भिडले होते. विशेषत: मागील 7 वर्षांत गॅसच्या किमती दुपटीने वाढल्या. त्यात गॅसवर मिळणारी सबसिडी कधी बंद झाले, तेही कळले नाही.. इंधन दरवाढीपाठोपाठ गॅस दरवाढीने कळस गाठला..
दरम्यान, महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, मोदी सरकारने पुन्हा एकदा ‘एलपीजी’ गॅस सिलिंडरवर सबसिडी देण्यास सुरुवात केली आहे. गॅस सबसिडीचे पैसे ग्राहकांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात येत आहेत. आता ‘एलपीजी’ गॅस ग्राहकांना प्रति सिलिंडरमागे 79.26 रुपये सबसिडी म्हणून दिले जात आहेत.
दरम्यान, काही ग्राहकांना 158.52 रुपये, तर काहींना 237.78 रुपये सबसिडी (LPG Subsidy) मिळत असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे गॅस सबसिडीच्या रकमेबाबत संभ्रम असला, तरी सबसिडी सुरु झाल्याने ग्राहकांच्या तक्रारी येणे बंद झाले आहे.
सबसिडी आली की नाही, असे तपासा..
गॅस सबसिडीचे पैसे खात्यात जमा झाले की नाही, हे तपासण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला नोंदणीकृत मोबाइल नंबरद्वारे नि दुसरा एलपीजी आयडीद्वारे, जो तुमच्या गॅस पासबुकमध्ये लिहिलेला आहे. चला तर मग त्याची प्रक्रिया जाणून घेऊ या..
- सर्वप्रथम https://mylpg.in/ या वेबसाईटवर जा. तेथे’ LPG Subsidy Online’ वर क्लिक करा. तुम्हाला तीन एलपीजी सिलिंडर कंपन्यांचे टॅब दिसतील. तुमच्या सिलिंडर कंपनीवर क्लिक करा.
- नंतर ‘Complaint’ ऑप्शनवर ‘Next’ बटणावर क्लिक करा. तुमच्यासमोर बँक डिटेल्स दिसतील. त्यावरुन सबसिडीचे पैसे खात्यात जमा झाले की नाही, याची माहिती मिळेल..
सबसिडीवर किती खर्च?
गॅस सबसिडीवर मोदी सरकारने 2021 मध्ये 3,559 कोटी रुपये खर्च केला आहे. 2020 मध्ये हा खर्च 24,468 कोटी रुपये होता. जानेवारी-2015 मध्ये ‘डीबीटीएल’ (DBTL) योजनेअंतर्गत गॅसवर सबसिडी देण्यास सुरुवात झाली होती.
उसाच्या ‘एफआरपी’चा प्रश्न हायकोर्टात..! राज्य सरकारने काय तोडगा काढलाय, वाचा..
एअरटेलचे प्रीपेड प्लॅन महागले, आता किती जादा पैसे मोजावे लागणार, वाचा..