Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

उसाच्या ‘एफआरपी’चा प्रश्न हायकोर्टात..! राज्य सरकारने काय तोडगा काढलाय, वाचा..

पुणे : राज्यातील कारखान्यांकडे उसाच्या ‘एफआरपी’ची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. एवढेच नाही, तर या रकमेवरील व्याजाचा आकडाही कोट्यवधींच्या घरात आहे. यंदा ही रक्कम अदा केल्याशिवाय कारखान्याची धुराडी पेटवायची नाहीत, अशा सुचना साखर आयुक्तांनी केली होती. मात्र, काही साखर कारखान्यांनी नियमांचे उल्लंघन केले, तर काहींनी रक्कम अदा केली.

Advertisement

राज्य सरकारने गेल्या वर्षी ‘एफआरपी’ची रक्कम तीन टप्प्यांत देण्याची भूमिका घेतली होती. त्याला केंद्र सरकारही अनुकूल होते. मात्र, हे सगळे नियमात नसून शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची थकीत रक्कम एकरकमीच, व्याजासह मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Advertisement

राज्य सरकार त्यावर कोणतेच धोरण घेत नसल्याने अखेर उसाच्या ‘एफआरपी’चा मुद्दा आता उच्च न्यायालयात गेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून थकीत ‘एफआरपी’ हा केवळ चर्चेचा विषय बनला होता. आता याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Advertisement

ऊस नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोली यांनी ही याचिका दाखल केलीय. याचिकेवरील सुनावणीसाठी उच्च न्यायालयाने 50 हजार रुपये अनामत रक्कम भरण्यास सांगितले आहे. त्यामुळे ही रक्कम लोकवर्गणीतून गोळा करुन हा लढा उभारणार असल्याचे इंगोले यांनी स्पष्ट केले आहे.

Loading...
Advertisement

उसाचा हंगाम सुरु होऊन दोन महिने उलटली, मात्र, अद्यापही (FRP amount) ‘एफआरपी’ चा मुद्दा निकाली निघालेला नाही. ‘एफआरपी’ची रक्कम एकरकमी द्यायला पाहिजे, हा नियम आहे. मात्र, गतवर्षीही राज्य सरकारच्या हस्तक्षेपामुळे ही रक्कम तीन टप्प्यात देण्यात आली होती.

Advertisement

उशिरा देण्यात आलेल्या ‘एफआरपी’चे विलंब व्याज शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी इंगोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन हायकोर्टाने याचिकादार इंगोले यांना जनहित याचिका चालवण्यासाठी 50 हजार रुपये कोर्टाकडे अनामत रक्कम भरण्यास सांगितले आहे..

Advertisement

ही रक्कम आपण लोकवर्गणीतून गोळा करु, परंतू लढा कायम ठेवणार असल्याची भूमिका इंगोले यांनी घेतली आहे. शिवाय यापूर्वीही अशाच प्रकारे रक्कम अदा करावी लागली होती. दोन्ही वेळेसही लोकवर्गणीतून रक्कम भरुन न्यायालयीन लढाई त्यांनी जिंकलेली आहे. त्यामुळे यावेळीही शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

शेअर्स बाजार कोसळला..! भांडवली बाजाराची स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..
रेल्वेचा ज्येष्ठ नागरिकांच्या खिशात हात.. अशा प्रकारे घेतले मोठ्या प्रमाणात पैसे…

Advertisement
Advertisement

Leave a Reply