Take a fresh look at your lifestyle.

रेल्वेचा ज्येष्ठ नागरिकांच्या खिशात हात.. अशा प्रकारे घेतले मोठ्या प्रमाणात पैसे…

नवी दिल्ली : रेल्वेतून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिक पुरुषाला प्रवास भाड्यात 40 टक्के, तर ज्येष्ठ नागरिक महिलेला भाड्यात 50 टक्के सूट दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय हे 58 वर्षांपेक्षा अधिक असावे, तर पुरुषाचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक असावे, अशी अट आहे. मात्र, कोरोना काळात ज्येष्ठांना रेल्वेकडून ही सवलत मिळाली नसल्याचे समोर आले आहे..

Advertisement

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून भारतातील अनेक सेवा ठप्प झाल्या होत्या. त्यात रेल्वेचाही समावेश होता. रेल्वे सेवा बंद असल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सरकारने काही विशेष रेल्वे सुरु करण्यास परवानगी दिली होती. मात्र, त्यावेळी रेल्वेने आपल्या सर्व योजना रद्द केल्या होत्या. त्यामुळे या काळात वृद्धांना पूर्ण भाडे भरूनच प्रवास करावा लागला.

Advertisement

कोरोना काळात 2020 पासून रेल्वेने आपल्या सर्व सवलती रद्द केल्या होत्या. त्याचा मोठा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसल्याचे समोर आलेय. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या विविध योजनांचा लाभ मिळतो, मात्र कोरोना काळात या सर्व सवलती बंद असल्याने वृद्धाना रेल्वेने प्रवास करताना पूर्ण भाडे द्यावे लागले. कोरोना काळात जवळपास 4 कोटी ज्येष्ठांनी रेल्वेने प्रवास केला. त्यांच्याकडून भाड्याचे पूर्ण पैसे घेण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आलेय.

Advertisement

मध्य प्रदेशमधील चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारांतर्गंत मागविलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे.

Advertisement

दरम्यान, रेल्वेने प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात सवलत द्यावी की नको, याबाबत दोन मतप्रवाह आहेत. मध्यतंरी रेल्वेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी वृद्धांना देण्यात येणारी भाडे सवलत बंद करण्याचाही विचार पुढे आला होता. या प्रस्तावावर विचार करण्यासाठी रेल्वेने 2016 मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानंतर 2017 पासून भाड्यात सूट हवी आहे की नको, हे ऐच्छिक करण्यात आले आहे.

Advertisement

शेअर्स बाजार कोसळला..! भांडवली बाजाराची स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..
अमेझाॅन, फ्लिपकार्टला दणका..! ऑनलाईन वस्तूंची खरेदी करण्यापूर्वी हे वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply