मुंबई : पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात आणखी चार ते पाच दिवस पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. येत्या 22 नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
राज्यातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. मच्छिमारांनी अरबी समुद्रात 21 व 22 नोव्हेंबरला जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. राज्यात पुढील चोवीस तासांत पावसाची परिस्थती कायम राहणार आहे.
राज्यातील थंडी गायब
अंदमानच्या समुद्रात गेल्या आठवड्यात कमी दाबाचे पट्टा निर्माण होऊन त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला. सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन हलकी थंडी गायब झाली. आकाश अंशत: ढगाळ झालेय. कोकणात काही भागांत पाऊस झाला. नंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे हिवाळा गायब झाला असून, पावसाळी स्थिती दूर झालेली नाही.
दरम्यान, रब्बी पिकांना थंडी आवश्यक असताना, ढगाळ हवामानाचा पिकांना फटका बसला आहे. पिकांवर रोगांचा प्रादूर्भाव वाढला असून, पावसामुळे काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेय. तसेच तुरीची फुलगळ झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
बाप रे..! पुलवामा हल्ल्यासाठी रसायनांची खरेदी अमेझाॅनवरुन.. तपासात धक्कादायक गोष्टी समोर..
एअरटेलचे प्रीपेड प्लॅन महागले, आता किती जादा पैसे मोजावे लागणार, वाचा..