Take a fresh look at your lifestyle.

बाप रे..! पुलवामा हल्ल्यासाठी रसायनांची खरेदी अमेझाॅनवरुन.. तपासात धक्कादायक गोष्टी समोर..

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये 2019 साली झालेला दहशतवादी हल्ला म्हणजे देशासाठी एक काळा दिवस होता.. या हल्ल्यात 40 ‘सीआरपीएफ’ जवानांचा बळी गेला होता. राष्ट्रीय तपास संस्थेकडून या प्रकरणाचा तपास केला जात असताना, या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Advertisement

पुलवामा हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी चक्क ‘अमेझॉन’ या ई-काॅमर्स कंपनीच्या वेबसाईटवरून रासायनिक पदार्थ मागविल्याची माहिती समोर आली आहे. कन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स म्हणजेच ‘कॅट’ (CAIT)ने ‘अमेझॉन’वर हा गंभीर आरोप केला आहे. अमेझाॅन कंपनीकडून वारंवार नियमांची आणि देशाच्या सुरक्षा निकषांची पायमल्ली केल्याचाही आरोप केला आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वीच ‘अमेझॉन’वरून गांजाची तस्करी झाल्याचे समोर आले होते. त्याबद्दल कंपनीवर टीका झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच, हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, आता हे प्रकरण देशाच्या सुरक्षेशी संबंधित असल्यामुळे, ‘अमेझाॅन’वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 2019 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 ‘सीआरपीएफ’ जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी जी रसायनं वापरली होती, त्याची डिलिव्हरी ‘अमेझॉन’वरुन करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

Advertisement

‘अमेझॉन’ने याबाबतचे तपशील राष्ट्रीय तपास संस्थेला सादर केले आहेत. विशेषतः  भारतात बंदी असलेल्या ‘अमोनियम नायट्रेट’ची डिलिव्हरीही ‘अमेझॉन’वरून केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात बंदी असणारे पदार्थ ‘अमेझॉन’वरून कसे पुरविले जातात, असा आक्षेप घेत ‘कॅट’ने अमेझाॅनवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

Advertisement

दहशतवाद्यांनीही दिली होती कबुली
हा स्फोट घडवून आणण्यासाठी ‘अमेझॉन’वरून आयईडी, बॅटरी आणि इतर साहित्याची खरेदी करण्यात आली होती. तसेच ‘अमोनियम नायट्रेट’ आणि ‘नायट्रोग्लिसरीन’चाही पुरवठा करण्यात आला होता. त्या आधारेच बॉम्ब बनविल्याचे तपासात स्पष्ट झालं आहे.

Advertisement

देशातील जवानांचा जीव घेणारे नि देशात बंदी असलेले पदार्थ ‘अमेझॉन’वरुन पुरविल्याचे समोर आल्याने या कंपनीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल यांनी केली आहे.

Advertisement

भारतात क्रिप्टो ट्रेंड : क्रिप्टोकरन्सीबाबत मोदी सरकारचा काय आहे प्लॅन.. जाणून घ्या
रिलेशनशिप : `या` पाच सवयींमुळे पती-पत्नीचे नाते हॊईल अधिक घट्ट .. जाणून घ्या

Advertisement
Advertisement

Leave a Reply