Take a fresh look at your lifestyle.

फ्लिपकार्टवरुन आता औषधे मागविता येणार.. या कंपनीसोबत केलाय करार..

नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपन्यांमार्फत आता घरबसल्या हवी ती वस्तू मिळते.. कोरोना काळात तर ऑनलाईन खरेदीला उधाण आले होते. घरातील दैनंदिन वापराच्या वस्तूंपासून ते कपड्यांपर्यंतची खरेदी घरबसल्या एका क्लिकवर केली जात आहे. त्यात आता जीवनदायी ठरणाऱ्या औषधांचीही भर पडली आहे.

Advertisement

ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या ‘फ्लिपकार्ट’ने आता आरोग्य क्षेत्रात एन्ट्री केलीय. त्यामुळे आता आपल्याला फ्लिपकार्टवरून घरबसल्या ऑनलाईन औषधे मागविता येणार आहेत. त्यासाठी कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी ‘फ्लिपकार्ट हेल्थ प्लस’ नावाची नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी फ्लिपकार्टने कोलकाता स्थित ‘सस्तासुंदर’ कंपनीसोबत करार केला आहे.

Advertisement

‘फ्लिपकार्ट’चा ‘सस्तासुंदर’सोबत करार
याबाबत माहिती देताना ‘फ्लिपकार्ट’ने सांगितले, की आम्ही आता आमच्या ग्राहकांना ऑनलाईन औषधे, तसेच आरोग्याशी संबंधित इतर गोष्टी खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. ‘फ्लिपकार्ट हेल्थ प्लस’ अतंर्गत ग्राहकांना फ्लिपकार्टवरून औषधे खरेदी करता येणार आहेत. त्यासाठी कलकत्ता स्थित ‘सस्तासुंदर’ कंपनीशी करार करण्यात आला आहे.

Advertisement

सस्तासुंदर ही एक ऑनलाईन औषधे व आरोग्य सुविधा पुरवणारी कंपनी आहे. सध्या ही कंपनी आपल्या ग्राहकांना तब्बल 490 प्रकारच्या औषधी पुरवते. ग्राहकांना कमीत कमी किमतीत दर्जेदार औषधे उपलब्ध करुन देण्याचे कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

दरम्यान, फ्लिपकार्ट आता सस्तासुंदरचे बहुमत भागभांडवल खरेदी करणार आहे. या करारावर दोन्ही कंपन्यांतर्फे स्वाक्षरी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता फ्लिपकार्टवरुनही आवश्यक औषधे खरेदी करता येणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement

पेट्रोलचे सोडा.. अन स्कॉच प्या की जोरात.. महाराष्ट्र सरकार मेहरबान.. 50 टक्के झालीय करमुक्ती..!
पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी अमेरिका करणार मदत, नेमकं काय धोरण असेल, वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply