Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी अमेरिका करणार मदत, नेमकं काय धोरण असेल, वाचा..

नवी दिल्ली : मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी इंधनावरील अधिभार कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पेट्रोलचे दर लिटरमागे 5 रुपयांनी, तर डिझेलचे दर १० रुपयांनी कमी झाले. मात्र, त्यानंतरही भारतात पेट्रोल-डिझेलचे दर शंभर रुपयांच्या खाली आलेले नाहीत. आताही त्यात सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यास त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावर होतो. कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रीत आणण्यासाठी आता अमेरिका महत्त्वपूर्ण पाऊल उचणार आहे. त्याचा फायदा भारतासह इतर देशांनाही होणार आहे.

Advertisement

अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सतत कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरलमागे 85 डॉलरवर पोहोचले आहेत. त्याचा फटका अमेरिकेलाही बसत आहे. कच्च्या तेलाचे दर नियंत्रीत आणण्यासाठी बायडन सरकार नवी  रणनिती आखण्याच्या तयारीत आहे.

Advertisement

अमेरिकन सरकार ‘एडमिनिस्ट्रेशन यूएस स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ (SPR) लागू करणार असल्याचे समजते. ‘एसपीआर’ लागू झाल्यास कच्च्या तेलाचे दर नियंत्रणात येतील. त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा भारतासारख्या देशांनाही होणार आहे. त्यामुळे इंधनाच्या किमती काही प्रमाणात तरी कमी होणार असल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

‘एसपीआर’ म्हणजे काय?
युद्ध व आणिबाणीच्या परिस्थितीत इंधनाचे दर नियंत्रीत राहावेत, यासाठी हे धोरण आखण्यात येते. 1975 मध्ये ‘एसपीआर’ धोरणाची निर्मिती झाली होती. आखाती देशांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने अमेरिकन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला, तेव्हा अमेरिकेकडून ‘एसपीआर’चा वापर करण्यात आला होता.

Advertisement

मॅक्सिकोच्या खाडीत आलेल्या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले होते. तेव्हाही कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या होता. त्यावेळीही अमेरिकेने ‘एसपीआर’चा वापर करून कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रीत केल्या होत्या.

Advertisement

‘एसपीआर’ अंतर्गंत कच्च्या तेलाचे उत्पादन हे मागणीपेक्षा जास्त वाढविले जाते, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहतात. याचा फायदा भारतासोबत कच्च्या तेलासाठी इतर देशांवर अवलंबून असणाऱ्या इतर देशांना देखील होणार आहे.

Advertisement

ग्रामीण भागात उडणार राजकीय धुराळा, ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका जाहीर, कधी होणार मतदान, वाचा..
‘पेटीएम’च्या आयपीओने गुंतवणुकदारांचं दिवाळं.. भांडवली बाजारात नेमकं काय झालं, वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply