Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नाक दाबताच तोंड उघडले..! उसाचे पैसे न देणाऱ्या कारखान्यांबाबत घेतलाय हा निर्णय..!

पुणे : साखर कारखान्यांना शेतकऱ्यांनी ऊस दिला, पण शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम देण्यास साखर कारखाने टाळाटाळ करीत होते. अखेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ‘एफआरपी’ थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर राज्य सरकारनं कारवाईचा बडगा उगारला.

Advertisement

पैसे न देणाऱ्या साखर कारखान्यांना यंदाच्या हंगामात गाळप परवाने देणार नसल्याचा निर्णय साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला होता. त्यामुळे राज्यातील जवळपास 43 साखर कारखान्यांचे गाळप परवाने थांबविण्यात आले होते. विशेष म्हणजे, त्यात अनेक दिग्गज नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश होता.

Advertisement

साखर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारताच राज्यातील 43 पैकी 21 कारखान्यांनी सुमारे 90 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. राज्य सरकारने या कारखान्याचे नाक दाबताच तोंड आपोआप उघडले गेले.

Advertisement

ही तर शेतकऱ्यांची फसवणूक..!
याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, की ‘एफआरपी’ थकीत ठेवणे, म्हणजे एकप्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक आहे. कारखाने सुरु होण्यापूर्वी संचालकांकडून मोठ-मोठी आश्वासने दिली जातात. गाळपासाठी अधिकाधिक ऊस कारखान्यांकडे यावा, यासाठी असे केले जाते. मात्र, नंतर साखर कारखाने शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पैसा देत नाहीत. त्यामुळे ही परवानगी नाकारली होती. शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा दिला, की कारखान्यांनाही गाळपासाठीची परवानगी देण्यात येणार आहे.

Loading...
Advertisement

22 कारखान्यांकडून डोळेझाक
दरम्यान, ‘एफआरपी’ न दिल्यामुळे अजूनही 22 साखर कारखान्यांना गाळप परवाने दिलेले नाहीत, तर 21 कारखान्यांनी सुमारे 90 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. त्यामुळे या साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. उर्वरित 22 कारखान्यांनी एफआरपी दिल्यानंतरच त्यांना गाळप परवाना देणार असल्याचे साखर आयुक्त गायकवाड यांनी सांगितले.

Advertisement

पोषक वातावरण नि उसाचे वाढलेले क्षेत्र, यामुळे साखर उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी 10 कोटी 20 लाख टन साखर उत्पादन झाल्याची माहिती साखर आयुक्त गायकवाड यांनी दिली.

Advertisement

कोयना धरणाबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय..त्याचा काय परिणाम होऊ शकतो, वाचा
चीनची दडपशाही सुरूच : ‘त्या’ देशास त्रास देण्यासाठी केलाय हा उद्योग; जाणून घ्या, काय आहे प्रकार..

Advertisement
Advertisement

Leave a Reply