Take a fresh look at your lifestyle.

आयसीसीकडून सौरव गांगुलीला मिळाली मोठी जबाबदारी.. अनिल कुंबळेची घेणार जागा

दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला आयसीसी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. तो अनिल कुंबळेची जागा घेणार आहे.

Advertisement

कुंबळेने नऊ वर्षे हे पद भूषवले. कुंबळेने प्रत्येकी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. आता तो या पदावर जास्त काळ राहू शकत नव्हता. कुंबळे हा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली यांचा निकटवर्तीय मनाला जातो. तो भारताचा कसोटी कर्णधारही होता. ही कमिटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती खेळाच्या अटी आणि नियमांवर देखरेख करते.

Advertisement

गांगुली हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली हा भारतातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो. 1996 मध्ये लॉर्ड्सवर पदार्पण करताना त्याने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते. गांगलीने 49 कसोटी आणि 146 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले.

Advertisement

सौरव गांगुलीनेच भारतीय संघाला परदेशी भूमीवर लढायला शिकवले. त्याने आपल्या नेतृत्वाखाली 49 पैकी 21 कसोटी सामने जिंकले. तर 146 एकदिवसीय सामन्यांपैकी 76 सामने जिंकण्यात यश आले.

Advertisement

माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतासाठी 113 कसोटी सामने खेळले ज्यात त्याने 7212 धावा केल्या. गांगुलीच्या नावावर कसोटीत 16 शतके आणि 35 अर्धशतके आहेत. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये 239 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

Advertisement

त्याने 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 11363 धावा केल्या. गांगुलीची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या १८३ धावा होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये गांगुलीने 22 शतकांसह 72 अर्धशतके केली आहेत.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply