Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

हुश्य… इस्रोचे ‘चांद्रयान-2’ नि नासाचा ‘एलआरओ’मधील टक्कर टळली.. अंतराळात नेमकं काय घडलं, वाचा

नवी दिल्ली : रशियाने अंतराळातील उपग्रह नेस्तनाबूत करणाऱ्या मिसाईलचे (ASAT) नुकतेच परिक्षण केले. या चाचणीवेळी रशियाने आपल्याच एका जुन्या ‘कॉसमॉस-1408’ उपग्रहावर मिसाईल डागले. या उपग्रहाच्या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणावर अवशेष फेकले गेले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेल्या अंतराळवीरांच्या जिवावर बेतले होते. त्यांना बचावासाठी सोमवारी (ता. 15) ट्रान्सपोर्ट स्पेस क्राफ्टमध्ये लपावे लागले होते. या प्रकारामुळे अमेरिका रशियावर संतापला आहे.

Advertisement

ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक मोठा अपघात टळल्याचे समोर आले आहे. रशियाच्या या प्रकारामुळे भारताचे ‘चांद्रयान-२’ आणि ‘नासा’चा उपग्रह ‘लूनर रिकोनिसेंस ऑर्बिटर’ (LRO) हे एकमेकांवर आदळणार होते. दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. एकाच वेळी एकमेकांच्या मार्गातून जाणार होते. परंतू, अखेरच्या क्षणी ‘इस्त्रो’ने चांद्रयानाच्या ध्रवीय कक्षेत बदल केला, चांद्रयानाचा वेग कमी केला. त्यामुळे ही टक्कर वाचली. इस्त्रोने मोठ्या प्रयत्नांनी चांद्रयान- २ वाचविले.

Advertisement

‘चांद्रयान-२ ऑर्बिटर’ आणि ‘एलआरओ’मध्ये जवळपास 100 मीटरपेक्षा कमी अंतर असणार होते. दोन्ही उपग्रह एकमेकांच्या जवळ येण्याआधीच इस्त्रो आणि नासाच्या ही बाब लक्षात आली. हा अपघात टाळण्यासाठी collision avoidance manoeuvre (CAM) ची गरज होती.

Loading...
Advertisement

‘चांद्रयान-2’ आणि ‘एलआरओ’ दोन्ही उपग्रह चंद्राच्या ध्रुवीय कक्षेत परिक्रमण करतात, त्यामुळे दोन्ही उपग्रह चंद्राच्या ध्रुवांवर एकमेकांच्या जवळ येतात. अशी वेळ आलीच तर इस्त्रो आपल्या कक्षेत लगेचच बदल करून अपघाताची शक्यता टाळते. ही अशी पहिलीच वेळ ‘इस्त्रो’वर आली आहे. हा खूप चांगला अनुभव होता, असे इस्त्रोने म्हटले आहे.

Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांना 24 तासांचा अल्टीमेटम, एसटी महामंडळाने काय इशारा दिलाय, वाचा..!
आयसीसीने केली मोठी घोषणा..! क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक केले जाहीर; पहा, कुठे होणार टी 20 विश्वकप, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा

Advertisement
Advertisement

Leave a Reply