Take a fresh look at your lifestyle.

आता सूर्यास्तानंतरही पोस्टमाॅर्टम करता येणार, मोदी सरकारने बदलला ब्रिटीशकालीन नियम, असा फायदा होणार..

मुंबई : इंग्रजांच्या काळात शवविच्छेदनाबाबत एक नियम करण्यात आला होता. त्यानुसार भारतात पोस्टमॉर्टेम करण्यासाठी एक ठराविक वेळ निश्चित केली होती. त्यानुसार सूर्योदय ते सूर्यास्त याच कालावधीत पोस्टमॉर्टेम करता येत होते. कुठल्याही परिस्थितीत सूर्यास्तानंतर पोस्टमॉर्टेम केले जात नसे. मात्र, त्यामुळे अनेकदा पोस्टमॉर्टेमला उशीर होत असे. त्यासाठीची प्रक्रिया थांबवून ठेवावी लागत असे.

Advertisement

मोदी सरकारने ब्रिटीशकालिन हा नियम रद्द केला आहे. देशात आता सूर्यास्तानंतर शवविच्छेदन (Post-mortem) करता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे आता सूर्यास्तानंतरही देशातील हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन होणार आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करीत ही माहिती  दिली..

Advertisement

दरम्यान, सूर्यास्तानंतर पोस्टमॉर्टेमसाठी परवानगी दिलेली असली, तरी ती सरसकट दिलेली नाही. खून, बलात्कार, आत्महत्या अशा स्वरूपाच्या गुन्हेगारी आणि संवेदनशील प्रकरणांत सूर्यास्तानंतर पोस्टमॉर्टेम करता येणार नाही. मात्र, इतर सामान्य प्रकरणांत तशी परवानगी देण्यात आलीय. अवयवदानासह इतर अनेक बाबींसाठी या निर्णयाचा फायदा होणार आहे.

Advertisement

हॉस्पिटल सुसज्ज असेल, रात्रीच्या वेळी पोस्टमॉर्टेम करण्यासाठी आवश्यक सर्व साधनसुविधा उपलब्ध असल्यास अशा ठिकाणी रात्रीच्या वेळीही पोस्टमॉर्टेम करता येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. मंडाविया यांनी दिली.

Advertisement

आतापर्यंत इंग्रजांपासून चालत आलेला नियमच लागू होता. मात्र, मोदी सरकारनं पहिल्यांदाच तो नियम बदलला असून, इंग्रजांचा जमाना आता संपला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात असा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला असून, इंग्रज काळापासून चालत आलेला नियम बदलण्यात आला आहे. हा निर्णय गतीमान आणि कार्यक्षम प्रशासनाची पावती असल्याचा दावाही मंडाविया यांनी केला आहे.

Advertisement

इजिप्तमध्ये विंचवांची दहशत.. दंशाने काहींचा मृत्यू, दवाखाने हाऊसफुल, पाहा नेमकं काय झालंय..
बाब्बो.. 5 कोटींची घड्याळे..! पण कोट्यवधींच्या घड्याळावर पांड्याने म्हटलेय ‘असे’; पहा नेमकी किती आहे किंमत

Advertisement
Advertisement

Leave a Reply